कानपूर (उत्तरप्रदेश): उत्तर प्रदेशात आजकाल बाबांचा वावर वाढला आहे. सनातन धर्माच्या प्रचारासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कसरत करत आहे. मग ते बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री असोत किंवा कानपूर शहरातील बिधानू पोलीस स्टेशन हद्दीतील करौली गावातील संतोष सिंह भदौरिया उर्फ करौली बाबा असोत. दोन्ही बाबा यावेळी चर्चेचा विषय बनले आहेत. पण, सध्या करौली बाबांवर एकामागून एक आरोप होत आहेत, त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
आयकरने चौकशी केली तरी चालेल:बाबा चोवीस तास अंगरक्षकांच्या संरक्षणामध्ये राहतात आणि बाबांच्या दिमतीला अनेक आलिशान वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांची किंमत करोडोंच्या घरात आहे. बाबांकडे रेंज रोव्हर कारही आहे. दुसरीकडे, ईटीव्ही भारतने 23 मार्च रोजी बाबांना विचारले की, तुम्ही इतके विलासी जीवन कसे जगता, तेव्हा संतोष सिंह भदौरिया यांनी उत्तर दिले की, ते दरवर्षी प्रत्येक वस्तूवर कर भरतात. येथे भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादावरही बारकोड असतो. एवढेच नाही तर आयकर अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर येऊन चौकशी केली तरी आपल्याला कशाचीही चिंता नाही, असा दावा बाबा करतात.
प्रत्येक प्रक्रियेसाठी वेगळा खर्च:बाबांची भेट घेण्यापूर्वी आश्रमात 100 रुपयांची पावती घ्यावी लागते. यासह, येथे तुम्हाला अनेक मार्गांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. प्रत्येक प्रक्रियेसाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. यामध्ये जे भाविक आपल्या समस्या घेऊन येतात, त्यांच्यासाठी हवन प्रक्रियेचा खर्च 5 हजार ते 1लाख रुपयांपर्यंत असतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही साहित्य लागेल, ते सर्व साहित्य आश्रमात उपलब्ध आहे. यानंतर जेव्हा भक्त त्यांच्या समस्यांबाबत बाबांसमोर जातात तेव्हा बाबा माईकवरून मंत्र सांगतात.
तुरुंगवासही भोगलाय:वास्तविक, संतोष सिंह भदौरिया हे उन्नाव जिल्ह्यातील बराह सगवारचे रहिवासी आहेत. बाबा होण्याच्या प्रवासापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवला, त्यामुळे शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख होती. त्याचवेळी किसान युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले असता तेही त्यात सहभागी झाले होते. याच दरम्यान त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यामुळे बाबावर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.
चर्चच्या जमिनी बालकावल्याचा आरोप:तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर आयुर्वेदाच्या माध्यमातून होणाऱ्या उपचारांचीही माहिती घेतली. दरम्यान, त्यांनी माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याशी त्यांची जवळीक खूप वाढली होती. यामुळे त्यांना कोळसा महामंडळाचे अध्यक्षही करण्यात आले. मात्र, काही वेळातच त्यांना या पदावरून हटवण्यात आले. लोक म्हणतात की, फक्त बाबाच चमत्कार करतात असे नाही. संतोषसिंग भदोरिया याचाही गुन्ह्यांशीही संबंध आहे. चर्चच्या जमिनी बळकावल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
समस्या होतात दूर:बिधानू पोलीस स्टेशन हद्दीतील करौली गावात बाबा संतोष सिंह भदोरिया उर्फ करौली बाबा यांचे साम्राज्य 14 एकरात पसरले आहे. या आश्रमाचे अनेक गुण आहेत. बाबा सांगतात की इथे तुम्हाला २४ तास भक्त भंडाऱ्याचा प्रसाद घेताना दिसतील. दुसरीकडे, कॅन्टीनमध्ये इतर काही पदार्थही खाण्यास उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी भाविकांना पैसे मोजावे लागतात. लोकांच्या समस्यांसाठी आश्रमात हवन कुंडही करण्यात आले आहेत. यासोबतच या आश्रमात करौली सरकार राधारमण कामाख्या मातेचे मंदिर आहे. आश्रमात लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. तथापि, ज्यांना स्वतंत्र खोल्यांमध्ये राहायचे आहे त्यांच्याकडून शुल्क आकारले जाते. बाबांच्या आश्रमात केवळ कानपूर शहरातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक आपल्या समस्या घेऊन येतात आणि येथे आल्याने त्यांच्या सर्व समस्या दूर होतात असा त्यांचा विश्वास आहे.
हेही वाचा: आता जम्मू काश्मीरमध्येही सुरु होणार वंदे भारत रेल्वे