हैदराबाद : भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी त्यांच्या पक्षाची तेलंगणातील जाहीर सभा या महिन्याच्या १८ तारखेला खम्मममध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. (BRS public meeting in Khammam). या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे केजरीवाल, मान आणि अखिलेश यांनी सभेसाठी येण्यास सहमती दर्शवली आहे तर केरळचे मुख्यमंत्री सोमवारी आपला निर्णय जाहीर करतील.
एक लाखांहून अधिक लोकं येण्याची शक्यता : मुख्यमंत्री केसीआर 18 जानेवारील खम्मम जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर खम्मम जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील 100 एकर मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सभेसाठी एक लाखाहून अधिक लोकांची जमवाजमव होणार आहे. या महिन्याच्या 12 तारखेला महबूबाबाद आणि भद्राद्री कोठागुडेममध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांचे उद्घाटन होणार असले तरी तेथे केवळ बैठका होणार आहेत. 18 तारखेला होणाऱ्या सभेसाठी खम्मम व्यतिरिक्त महबूबाबाद, भद्राद्री, सूर्यपेट, नलगोंडा, वारंगल, मुलुगु आणि भूपालपल्ली जिल्ह्यातून लोक जमतील.