इंदूर :जी 20 परिषदेतून जागतिक स्तरावर भारत देश एक उभरता तारा म्हणून पुढं येत आहे. जागतिक स्तरावरील नेत्यांनी भारतानं केलेल्या जी20 परिषदेचं ( G20 Summits) कौतुक केलं. मात्र काही संकुचित मानसिकतेच्या जळकुट्या पक्षाचा चांगलाच जळफळाट यामुळे झाला. त्यामुळेच पुन्हा विदेशात जाऊन भारतावर टीका केल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. मात्र जनता त्यांना आगामी निवडणुकीत तिसऱ्यांदा धडा शिकवेल, असंही मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी म्हणाले.
काय म्हणाले ज्योतिरादित्य सिंधिया :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं जी20 परिषदेचं यशस्वी आयोजन केलं आहे. त्यामुळे भारत देश जागतिक पातळीवर उभरता तारा म्हणून पुढं येत आहे. मात्र काही लोकांची मानसिकता स्वत:ला सुधारण्याऐवजी इतरांना बदनाम करण्याची असते. त्यामुळेच भारताची प्रगती पाहुन त्यांचा जळफळाट होतो, असंही ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी म्हणाले. जी 20 परिषदेत आलेल्या जागतिक नेत्यांनी 'भारत दर्शन' केलं. त्यांनी भारताची आर्थिक आणि अध्यात्मिक शक्ती पाहिली. मात्र काही संकुचित मानसिकता असलेल्या पक्षांना जी20 परिषद यशस्वी झाल्याचा हेवा वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा विदेशी भूमित जाऊन भारतावर टीका केली. मात्र भारतीय जनतेनं आता हे ओळखलं आहे. त्यामुळे जनता त्यांना तिसऱ्यांदा धडा शिकवेल, असा हल्लाबोलही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी केला.