रांची (झारखंड) -पंतप्रधान नरेंद्रमोदींबद्दल आक्षेपाहार्र बोलल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणातील सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. खंडपीठाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
Rahul Gandhi: राहुल गांधींना झारखंड उच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यास नकार - Rahul Gandhi
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी आडनावावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यांच्या वक्तव्याविरोधात रांची दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेतली. ही याचिका रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
नियमाकडे दुर्लक्ष - न्यायमूर्ती संजय कुमार द्विवेदी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान राहुल गांधींच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, रांची जिल्हा न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दखल घेण्यात आली आहे, जी चुकीची आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करून कनिष्ठ न्यायालयाने त्यांच्या विरोधात दखल घेतली आहे. त्यामुळे ट्रायल कोर्टाने त्याच्यावर घेतलेली दखल रद्द करण्यात यावी. दरम्यान, तक्रारदार वकील प्रदीप मोदी यांनी न्यायालयाला सांगितले की, ट्रायल कोर्टाने घेतलेल्या दखलमध्ये सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. हे नियमानुसार आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत याचिका फेटाळून लावली आहे.
झारखंड उच्च न्यायालयात याचिका - याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, रांचीच्या मोरहाबादी येथे एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडणावावर टीप्पणी केली होती. त्यानंतर दुखावलेल्या रांचीचे वकील प्रदीप मोदी यांनी रांची सिव्हिल कोर्टात तक्रार याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेची रांची दिवाणी न्यायालयाने दखल घेतली. याच विरोधात राहुल गांधी यांच्या वतीने झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी झाली.