महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात?; पोलीस पाठवणार नोटीस - झारखंड आमदारांना लालूच

झारखंड सरकार पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची शुक्रवारी चौकशी करण्यात आली. त्यांनी रांची पोलिसांना तीन आमदारांची नावे सांगितली आहेत. तर महाराष्ट्रातील नेत्यांशी आपले संबंध असल्याची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. तर यापूर्वीच या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता.

Conspiracy case to topple Jharkhand government
झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात?

By

Published : Aug 7, 2021, 1:06 PM IST

रांची -झारखंड सरकार पाडण्यासाठी (Conspiracy to topple the government in Jharkhand) भाजपाकडून प्रयत्न करण्यात आले असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. तर रांची येथील डीएसपी प्रभात रंजन यांनी याप्रकरणात शुक्रवारी आरोपी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद यांची चौकशी केली. यावेळी या आरोपींनी महाराष्ट्रातील नेत्यांशी आपले संबंध असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे झारखंड पोलीस हे महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी चौकशी दरम्यान नोटीस पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

माझी झारखंडच्या नेत्यांशी भेट झाली नाही -बावनकुळे

झारखंड सरकार अस्थिर करण्यासाठी सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षाच्या आमदारांना पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा खुलासा झारखंड पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचे नागपूर कनेक्शन पुढे आल्यानंतर आता बावनकुळे यांच्या दिल्लीवारीसोबत या प्रकरणाचा संबंध जोडला जात आहे. बावनकुळे यांनी देखील १५ जुलै रोजी दिल्लीला गेल्याचे मान्य केले आहे. मात्र दिल्ली दौऱ्याचा उद्देश केवळ नवनियुक्त मंत्र्यांच्या भेटी घेणे एवढाच होता, असा दावा त्यांनी केला आहे. या दौऱ्यात माझी झारखंडच्या कोणत्याही नेत्यांशी किंवा आमदारांसोबत भेट झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

हेही वाचा - झारखंड सरकार प्रकरण : होय मी दिल्लीला गेलो होतो, पण राजकीय कामासाठी नाही; बावनकुळे यांचा खुलासा

1 कोटी रुपये रोख देण्याच्या बाबीवरून नाराजी -

झारखंड पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिन्ही आरोपींनी अशी कबुली दिली आहे की, झारखंडमधील तीन आमदार हे दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या भाजपा नेत्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत 1 कोटी रुपये रोख देण्याच्या बाबीवर आम्ही नाराज होऊन सर्वजण माघारी परत आलो होतो. पुन्हा आम्हाला मनवण्यासाठी ते रांची येथेही आले होते, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

मला कोणतीही नोटीस नाही, मी सहकार्य करणार - बावनकुळे

झारखंड पोलिसांकडून मला अद्याप चौकशी संदर्भात कोणतीही नोटीस किंवा समन्स मिळालेला नाही. भविष्यात अशी चौकशी होणार असेल तर मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे बावनकुळे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

पोलिसांची छापेमारी -

सरकार पाडण्याच्या प्रकरणात पोलिसांनी हॉटेल लिलैक येथे छापेमारी करण्यात आली होती. यावेळी रूम नंबर 310 मध्ये पोलिसांना चार सूटकेस, दो लाख रुपये रोख रक्कम, अनेक विमान टिकिट, अनेक मोबाईल फोनसह काही कागदपत्रे जप्त केली होती. याप्रकरणात आमदार कुमार जयमंगल उर्फ अनूप सिंह यांच्या तक्रारीवरून कोतवाली ठाण्यात राजद्रोह आणि दोखाधडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - मी झारखंडला कधी गेलोच नाही, भाजपाची बदनामी करण्याचा प्रकार- चंद्रशेखर बावनकुळे

हेही वाचा - झारखंड सरकार पडण्याचा डाव; चौकशीसाठी तयार असल्याचं बावनकुळेंचं विधान

ABOUT THE AUTHOR

...view details