तिरुवअनंतपुरम :केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज (बुधवार) केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये विशेषतः शबरीमला मंदिरासाठी नवीन कायदा आणण्याचे, प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला नोकरी देण्याचे, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांसाठी वर्षाला सहा गॅस सिलिंडर देण्याचे आणि माध्यमिक विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.
एससी आणि एसटी प्रवर्गातील भूमीहीन कुटुंबांना मोफत जमीन दिली जाईल, तसेच लव्ह जिहाद थांबवण्यासाठी आणि जबरदस्तीने होणारे धर्मांतर थांबवण्यासाठी कायदे आणण्यात येतील असेही या जाहीरनाम्यामध्ये म्हटले आहे.
इतर काही ठळक आश्वासने..
- समाज कल्याण निवृत्तीवेतनाची मर्यादा वाढवून ३,५०० रुपये करणार.
- 'नोक्कुकूली' आणि 'अत्तिमारी कूली'वर बंदी आणणार.
- पीएससी परीक्षेपूर्वी असणारी पात्रता चाचणी रद्द करणार.
- घटनात्मक तरतुदींच्या अनुषंगाने केआयएफबीचे पुनर्गठण केले जाईल आणि कॅग ऑडिट केले जाईल.