चेन्नई- केंद्राने पारीत केलेल्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि डीएमके यांना कृषी कायद्यासंदर्भात खुल्या चर्चेच आव्हान दिले आहे.
खुल्या चर्चेला तयार व्हा-
काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी नुकतेच केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यावर जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकारडून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातात की नाही याबाबत राहुल गांधी आणि डीएमकेच्या नेत्यांनी खुल्या चर्चेसाठी तयार व्हावे, असे आव्हान जावडेकर यांनी दिले आहे. ते शुक्रवारी चेन्नईमध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या -
राहुल गांधी यांनी बुधवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सत्यागरह म्हणून संबोधले होते. तसेच नागरिकांना शेतकरी विरोधी कृषी कायद्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहनही केले होते. एका माध्यमाचा अहवालाचा दाखला देत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या या कायद्यापासून व त्याच्या पासून होणाऱ्या अडचणींपासून वाचविण्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठिशी रहावे लागणार आहे. या सत्याग्रहामध्ये आपल्या सर्वांना देशाच्या अन्नादात्याचे समर्थन करावे लागेल, असे आवाहन केले होते.
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या चलो दिल्ली या आंदोलनाचा आज ३१ दिवस आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कशा पद्धतीने योग्य निर्णय घेतले हे जनतेपर्यंत पोहोचून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.