नवी दिल्ली: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोमवारी दुखापतीमुळे आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर ( Jasprit Bumrah Rulled Out T20 World Cup ) पडला. याबाबत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी एका निवेदनात पुष्टी केली की, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून बरा होत असलेल्या रवींद्र जडेजानंतर दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडणारा जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) हा दुसरा खेळाडू आहे. ज्याचा पर्याय शोधणे टीम इंडियासाठी खूप कठीण ठरणार आहे.
28 वर्षीय बुमराहला मागील महिन्याच्या सुरुवातीला पाठीच्या दुखापतीमुळे संघातून आराम देण्याच आला होता. त्याचबरोबर 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी ( T20 World Cup 2022 ) त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी विश्रांती आणि उपचारांचा सल्ला दिला होता. यामुळे त्याला आशिया कप 2022 ( Asia Cup 2022 ) मधूनही बाहेर ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी तो परतला. भारत 2-1 असा विजय मिळवला, पण बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नव्हता. दोन सामन्यांत त्याला एकच विकेट घेता आली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी बुमराहचाही भारताच्या संघात समावेश करण्यात आला होता, परंतु पाठदुखीच्या तक्रारीमुळे ( Jasprit Bumrah back injury ) तिरुअनंतपुरममधील पहिल्या टी-20 सामन्याला तो मुकला होता. यानंतर तो दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 मालिकेतून बाहेर असल्याची बातमी आली.
भारतासमोर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीची मोठी समस्या -
बुमराहच्या बाहेर पडण्याने गेल्या वर्षीच्या कामगिरीत सुधारणा करण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. 60 सामन्यांमध्ये 70 विकेट्स घेऊन तो T20I मध्ये भारताचा तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. बुमराह त्याच्या चांगल्या गोलंदाजीसाठी, विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर्ससाठी लक्षात ठेवला जातो. सध्या भारतासमोर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीची मोठी समस्या ( Big bowling problem for India in death overs ) आहे. आशिया कप 2022 मधील भारताच्या दारुण पराभवामागे हे सर्वात मोठे कारण असल्याचे मानले जात होते.