नवी दिल्ली - स्टार्ट अप्स हा नव्या भारताचा कणा ( Start Up Backbone India ) असणार आहे. तसेच, 16 जानेवारी हा दिवस आता 'राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( National Start Up Day Narendra Modi ) यांनी केली.
16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस - पंतप्रधानांची घोषणा
स्टार्ट अप्स हा नव्या भारताचा कणा ( Start Up Backbone India ) असणार आहे. तसेच, 16 जानेवारी हा दिवस आता 'राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( National Start Up Day Narendra Modi ) यांनी केली.
Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून कृषी आणि आरोग्यासह विविध क्षेत्रातील 150 पेक्षा जास्त स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, स्टार्ट अप्स हा नव्या भारताचा कणा असणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा स्टार्ट अप्सची भूमिका महत्त्वाची असेल. देशात होणाऱ्या नवनवीन शोधामुळे भारताचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे. या दशकाला भारताचे 'तंत्रज्ञान' असे म्हटले जात आहे.