महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Gandhi On jammu and kashmir: जम्मूतील तरुणांनी रोजगार मागितला, भाजपने दिला बुलडोझर.. राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

केंद्रातील भाजप सरकार जम्मू-काश्मीरमधील लोकांशी भेदभाव करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी आज केला आहे.

Peace in Kashmir can only be retained with unity: Rahul Gandhi
जम्मूतील तरुणांनी रोजगार मागितला, भाजपने दिला बुलडोझर.. राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

By

Published : Feb 12, 2023, 7:33 PM IST

नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार निशाणा साधला आणि म्हटले की, केंद्रशासित प्रदेशाला नोकऱ्या, चांगला व्यवसाय आणि प्रेम हवे होते, परंतु त्याऐवजी त्यांना भाजपचे प्रेम 'बुलडोझर'च्या स्वरूपात मिळाले. काँग्रेस, कॉन्फरन्स आणि पीडीपी (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) सारख्या अनेक मोठ्या पक्षांनी या मोहिमेबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि ती त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे.

जम्मू काश्मिरात अतिक्रमण विरोधी मोहीम:7 जानेवारी रोजी महसूल विभागाचे आयुक्त सचिव विजय कुमार बिधुरी यांनी सर्व उपायुक्तांना सरकारी जमिनींवरील 100 टक्के अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील 10 लाख कनलांहून अधिक जमीन अतिक्रमणातून मुक्त करण्यात आली आहे. आता याच मोहिमेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

जमीन हिसकावून घेण्याचे षडयंत्र:गांधींनी ट्विट केले की जम्मू-काश्मीरला रोजगार, उत्तम व्यवसाय आणि प्रेम हवे होते, पण त्यांना काय मिळाले? भाजपचा बुलडोझर. ते म्हणाले की, त्या भागातील लोकांनी अनेक दशके कष्टाने सिंचन केलेली जमीन त्यांच्याकडून हिसकावून घेतली जात आहे. शांतता आणि काश्मिरियत लोकांमध्ये फूट पाडून नव्हे तर एकत्र येण्याने सुरक्षित राहील. गांधी यांनी ट्विटसोबत मीडिया रिपोर्टही जोडला, ज्यात दावा केला होता की जम्मू-काश्मीरमधील अतिक्रमणविरोधी मोहिमेबाबत लोकांमध्ये घबराट आहे.

अनेक पक्षांनी केलाय विरोध:काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांसारख्या प्रमुख राजकीय पक्षांनी या मोहिमेविरुद्ध त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत आणि ते त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाचे आयुक्त सचिव विजय कुमार बिधुरी यांनी सर्व उपायुक्तांना 100 टक्के अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 10 लाख कनाल (एक कनाल = 605 चौरस यार्ड) पेक्षा जास्त जमीन परत मिळवली आहे.

बळकावलेल्या जमिनी परत घेणार:राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आश्वासन दिले की, या मोहिमेत सामान्यांना त्रास दिला जाणार नाही. प्रभावशाली लोकांनी बळकावलेल्या जमिनी परत मिळवल्या जातील. जम्मू विभागात अतिक्रमणविरोधी मोहिमेचा परिणाम म्हणून आतापर्यंत सुमारे 23,000 हेक्टर जमीन परत मिळवण्यात आली आहे, असे एका वृत्त एजन्सीने म्हटले आहे.

हेही वाचा: Rahul Gandhi On Adani in Loksabha: अदानींची संपत्ती आठ वर्षात ८ अब्ज डॉलर्सवरून १४० अब्ज डॉलर्स कशी झाली? राहुल गांधींचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details