नवी दिल्ली :राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड़ ( Jagdeep Dhankhar Wins ) यांची भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली ( new Vice President of India ) आहे. त्यांनी मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला ( Defeat of Margaret Alva ) आहे. धनखड यांना ५०० तर मार्गारेट अल्वा यांना २०० पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.
देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज ( Vice President Election ) मतदान झाले. एनडीए उमेदवार जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) व युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांच्यामध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी लढत झाली. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी निवडणुकीत आज मतदान केले.