महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jacqueline Fernandez : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची कोर्टात हजेरी - Sukesh Chandrasekhar case

न्यायालयाने 20 डिसेंबर रोजीची ब्रिफ सुनावणी पुढे ढकलल्यानंतर जॅकलीन (Jacqueline Fernandez) आज न्यायालयासमोर हजर झाली. या आधी नोव्हेंबरमध्ये दिल्ली कोर्टाने तिला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (200 crores Money laundering case) जामीन मंजूर केला होता. कारण त्यावेळी तपासादरम्यान आरोपीला अटक झाली नव्हती. (Jacqueline Fernandez in Delhi Patiala House Court).

Jacqueline Fernandez
जॅकलीन फर्नांडिस

By

Published : Jan 6, 2023, 8:19 PM IST

Updated : Jan 6, 2023, 9:13 PM IST

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) शुक्रवारी सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (200 crores Money laundering case) नवी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात (Delhi Patiala House Court) हजेरी लावली. जॅकलीन ही ईडी तपास करत असलेल्या प्रकरणातील एक आरोपी आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर तिची अनेक फेऱ्यांत चौकशी होणार आहे.

दिल्ली न्यायालयाने दिला जामीन :न्यायालयाने 20 डिसेंबर रोजीची ब्रिफ सुनावणी पुढे ढकलल्यानंतर जॅकलीन आज न्यायालयासमोर हजर झाली. या आधी नोव्हेंबरमध्ये दिल्ली कोर्टाने तिला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. कारण त्यावेळी तपासादरम्यान आरोपीला अटक झाली नव्हती.

चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणी हिला 30 नोव्हेंबरला अटक : 30 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांनी पिंकी इराणीला मुंबईतून अटक केली होती. जी चंद्रशेखरची जवळची सहकारी असल्याचे सांगितले जाते. तिनेच चंद्रशेखरची ओळख जॅकलीनशी ओळख करून दिली होती. तक्रारदार आणि इतर स्त्रोतांकडून वसूल करण्यात आलेल्या रकमेची तडजोड करण्यात आरोपी पिंकीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचाही आरोप आहे.

ईडीने सुकेशच्या पत्नीच्या 26 गाड्या जप्त केल्या :यापूर्वी याच न्यायालयाने 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल हिच्याकडून जप्त केलेल्या 26 कार ताब्यात घेण्याची अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) परवानगी दिली होती. पतियाळा हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी आरोपी लीना मारिया पॉलच्या चेन्नई फार्महाऊसमधून संलग्न 26 गाड्या ताब्यात घेण्याच्या ईडीच्या अर्जाला परवानगी दिली. या प्रकरणातील गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून या गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्या संलग्न करण्यात आल्याचा आरोप ईडीने याचिकेत केला आहे.

EOW ने 2021 मध्ये आरोपपत्र दाखल केले :दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 2021 मध्ये चंद्रशेखर, त्यांची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर 14 आरोपींची नावे घेऊन आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र IPC च्या विविध कलमांखाली आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (MCOCA) तरतुदींनुसार दाखल करण्यात आले आहे. EOW नुसार, लीना, सुकेश आणि इतरांनी गुन्ह्यातील पैसे लाँडर करण्यासाठी हवाला मार्गाचा वापर केला होता. तसेच शेल कंपन्या देखील तयार केल्या गेल्या. चंद्रशेखर आणि त्याची अभिनेत्री पत्नी या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी सप्टेंबर 2021 मध्ये फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती.

Last Updated : Jan 6, 2023, 9:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details