जबलपूर: मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हेल्मेट घालून अॅक्टिव्हा चालवणारा तरुण महिलांना मागून धक्काबुक्की करून तर कधी मारहाण करून पळून जातो. या हल्लेखोराची दहशत एवढी आहे की, आता महिला त्यांच्यासोबत काठी घेऊन फिरत आहेत. घरांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी काम करणे बंद केले आहे. आरोपीने आतापर्यंत 20 ते 25 महिलांना आपला बळी बनवला आहे. mukkabaaz biker targeting women in jabalpur महिलांनी जबलपूरचे एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांच्याकडे तक्रार केली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
महिलांना निशाणा : जबलपूर शहरातील संजीवनी नगर भागातील रस्ते नेहमीच्या दिवसात तुडुंब भरलेले असायचे. मात्र आता हे रस्ते गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुनसान झाले आहेत. कारण म्हणजे एक अज्ञात माथेफिरू हा महिलांना धक्काबुक्की करत आहे. घरातील काम करणाऱ्या महिलांना टार्गेट करतो. घरांमध्ये काम करणाऱ्या बहुतांश महिलांनी भीतीपोटी काम बंद करून घरात बसल्याचे सांगितले जात आहे. हिंमत दाखवत काही महिलांनी संजीवनी नगर पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेज देऊन एफआयआर दाखल केला आहे. हल्लेखोराची दहशत एवढी आहे की, आता महिला त्यांच्यासोबत काठी घेऊन फिरत आहेत.