श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार ( Two Lashkar-e-Taiba militants killed ) झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवादी शौकत अहमद शेखकडून ( Terrorist Shaukat Ahmed Sheikh ) मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी कुपवाडा येथील लोलाब भागात ऑपरेशन सुरू केले, त्यानंतर चकमक सुरू झाली.
काश्मीर प्रदेशातील पोलिसांनी ट्विट ( Kashmir Police Tweet ) केले की, विविध ठिकाणी शोध घेत असताना तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला, ज्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या भागात अजूनही चकमक सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.