महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Aditya L-१ Mission : भारताची सूर्याकडं झेप; आदित्य L-1 अंतराळयान 'या' यारखेला झेपावणार अवकाशात - इस्रो लाँच करणार आदित्य एल 1

'चंद्रयान-3' च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर आता 'इस्रो'नं 'आदित्य L-1' मिशन हाती घेतलंय. 'आदित्य L-1' हे यान येत्या 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात येणार आहे. आंध्र् प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथून हे यान प्रक्षेपित केलं जाणार आहे. (Aditya L1 Mission Launch Date) (ISRO Launch Aditya L1) (Aditya L1 Launch on 2 September)

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 3:42 PM IST

Updated : Aug 28, 2023, 5:15 PM IST

नवी दिल्ली - 'चंद्रयान-3' या यानाचं 23 ऑगस्टला चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्यात आलंय. आता 'इस्रो'नं भारताची पुढची मोहिम असलेलं 'आदित्य L-1' यान देखील येत्या 2 सप्टेंबरला प्रक्षेपित केलं जाणार आहे. हे यान सूर्याचा अभ्यास करणार आहे. (Aditya L1 Mission Launch Date) (ISRO Launch Aditya L1) (Aditya L1 Launch on 2 September)

आदित्य एल-1 मोहीम - 'इस्रो'नं चंद्रयान 3चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर शास्त्रज्ञ आता सूर्याच्या मोहीमेसाठी सज्ज आहेत. भारतानं बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आपलं मून लँडर यशस्वीरित्या उतरवलं. त्यामुळं इस्रोनं आता सूर्याकडं आपलं लक्ष केंद्रीत केलंय. ISRO येणाऱ्या 2 सप्टेंबरला 'आदित्य L-1 सोलर मिशन लाँच करणार आहे. (Aditya L 1 Mission) (Chandrayaan 3 Mission)

सूर्याचा अभ्यास करणारी पहिलीच मोहीम - सूर्याचा अभ्यास करण्याची 'इस्रो'ची ही पहिलीच मोहीम आहे. हे यान पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या 'लॅग्रेंज पॉइंट एकवर नेण्यात येणार आहे. या ठिकाणाहून ग्रहण किंवा कोणत्याही अडथळ्याशिवाय सूर्याचं निरीक्षण करता येतं. या स्थानावरून सूर्यावरील घटना काही सेकंदात पाहता येणार आहेत. या अंतराळयानावर सात उपकरणं असून, त्याद्वारे विविध निरीक्षणं नोंदवली जाणार आहेत.

'आदित्य L-1' मोहिमेचा उद्देश - 'आदित्य L1' सूर्याच्या प्रकाशमंडलातील चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणार आहे. इस्रोनं दिलेल्या महितीनुसार, आदित्य L1 क्रोमोस्फियर, गतिशीलता, सूर्याचं तापमान, कोरोनाचं तापमान, कोरोनल मास इजेक्शन आदीचा अभ्यास करणार आहे. सूर्यापासून उष्णता उत्सर्जित होण्यापूर्वीचा अभ्यास आदित्य L1 करणार आहे. अवकाशातील हवामान, इतर वैज्ञानिक बाबींचाही या मोहिमेत अभ्यास केला जाणार आहे.

हेही वाचा -

  1. Chandrayaan 3 : चंद्रयान मोहिमेत ठाण्यातील "स्प्रिंग" चा लँडिंगमध्ये महत्त्वाचा वाटा
  2. Politics on Chandrayaan ३ : 'आता अदानी चंद्रावर बांधणार फ्लॅट्स, शुद्ध शाकाहारींसाठीच मिळणार घरं'
  3. Chandrayaan ३ : 'चंद्रयान'वरून ठेवली बाळांची नावं; एक 'विक्रम' तर दुसरा 'प्रज्ञान'
Last Updated : Aug 28, 2023, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details