बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तीन प्रकारचे व्हेंटिलेटर विकसित केले आहेत. याच्या वैद्यकीत वापरासाठी त्यांनी ही टेक्नॉलॉजी हस्तांतरित करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना, इस्रोच्या या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे.
विविध फीचर्स असलेला 'प्राण'..
या व्हेंटिलेटर्सपैकी 'प्राण' (Programmable Respiratory Assistance for the Needy Aid- PRANA) हा अगदीच स्वस्त आणि पोर्टेबल आहे. हा एएमबीयू बॅगेला स्वबळावर सुरू ठेवतो. यामध्ये अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली आहे. तसेच, एअरवे प्रेशर सेन्सर, फ्लो सेन्सर आणि ऑक्सिजन सेन्सरही आहेत. तसेच, याला असलेल्या टच स्क्रीन पॅनलच्या मदतीने व्हेंटिलेशनचे विविध प्रकार निवडता येतात. एवढेच नव्हे, तर वीजपुरवठा खंडित झाल्यास अतिरिक्त बॅटरीचीही व्यवस्था या व्हेंटिलेटरमध्ये करण्यात आली आहे.