रांची (झारखंड) : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक ईशान किशन हा आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा शेजारी होणार आहे. ईशान किशन रांची येथील धोनीच्या फार्म हाऊसच्या अगदी जवळ एक रिअल इस्टेट प्रकल्प सुरू करणार आहे. (Ishan Kishan business near dhoni farm house). या प्रकल्पाचे भूमिपूजन आज होणार आहे. भूमिपूजनाच्या वेळी स्वत: ईशान किशन उपस्थित राहणार आहे. सोबतच भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Ishan Kishan in Real Estate Business).
धोनीच्या फार्म हाऊस जवळ प्रकल्प : मिळालेल्या माहितीनुसार, हा रिअल इस्टेट प्रकल्प शगुन ईशान इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तयार करत आहे. ईशानचे वडील प्रणव कुमार पांडे यांनी ईटीव्ही भारतला फोनवर सांगितले की, ईशान आता रिअल इस्टेट क्षेत्रातही काम करणार आहे. यासाठी त्याने महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसच्या अगदी जवळ हा प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली आहे. रांचीच्या जेएससीए मैदानावर झारखंड आणि केरळ यांच्यात रणजी सामना सुरू आहे. या सामन्यात ईशान किशन झारखंडकडून तर संजू सॅमसन केरळचा कर्णधार म्हणून खेळत आहे.