नवी दिल्ली :राजधानी दिल्लीत महिला IAS अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका IRS अधिकाऱ्याला अटक केली आहे. महिला आयएएस अधिकाऱ्याचा आरोप आहे की, आरोपी तिला जवळपास 3 वर्षांपासून त्रास देत होता. माहितीनुसार, कोरोनाच्या काळात महिला आयएएस अधिकाऱ्याची ड्युटी लागली होती. या दरम्यान आरोपीची पीडितेसोबत ओळख झाली. तेव्हापासून तो तिला सतत त्रास देत होता.
बऱ्याच काळापासून त्रास देत होता : पीडित आयएएस ऑफिसरने आरोप केला आहे की, आरोपी तिला खूप दिवसांपासून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. तिने त्याला अनेक वेळा समजावून सांगून ताकीदही दिली होती. असे असूनही तो ते ऐकता तिला वारंवार फोन करत होता. यानंतर महिला अधिकाऱ्याने पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग, पाठलाग आणि धमकावल्याची तक्रार केली. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी अधिकाऱ्याला अटक केली आहे. सोहेल मलिक असे आरोपीचे नाव आहे. तर महिला अधिकारी केंद्रीय मंत्रालयात सहसचिव पदावर कामाला आहेत. विशेष म्हणजे पीडित आयएएस ऑफिसरचा पतीही एक आयएएस अधिकारी आहे.