महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Instagram News : इन्स्टाग्रामवरील बग शोधणाऱ्या विद्यार्थ्याला फेसबुकने दिले लाखोंचे बक्षीस - सोशल मीडिया बातम्या

नीरज शर्मा हा पोद्दार इंटरनॅशनल कॉलेज (Poddar International College ) मध्ये बीसीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. नीरजला ऑनलाइन सर्फिंग करायला आवडते ( Neeraj loves surfing online ). इन्स्टाग्रामवरील बग शोधणाऱ्याला नीरज शर्माला फेसबुकने लाखोंचे बक्षीस ( Instagram Awrded Neeraj Sharma RS 38 lakh ) दिले.

neeraj sharma
नीरज शर्मा

By

Published : Sep 19, 2022, 4:13 PM IST

Updated : Sep 19, 2022, 4:27 PM IST

जयपूर : कोट्यवधी लोकांची सोशल मीडिया खाती हॅक होण्यापासून वाचवल्याबद्दल नीरज शर्माला इन्स्टाग्रामकडून 38 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे ( Instagram Awrded Neeraj Sharma RS 38 lakh ). मिळालेल्या माहितीनुसार, नीरज शर्मा पोद्दार इंटरनॅशनल कॉलेज ( Poddar International College ) विद्यार्थी आहे. त्याने इंस्टाग्राममध्यील एक बग शोधून काढला ( Neeraj Sharma find instagram bug ) आहे. ज्यामुळे लॉगिन आणि पासवर्ड बदलल्याशिवाय कोणत्याही यूजरचे अकाउंट हॅक होऊ शकत होते. या बगची माहिती नीरज शर्माने इन्स्टाग्राम आणि फेसबुकला दिली. या कामासाठी नीरज शर्माला 38 लाखांचे बक्षीस देण्यात आले.

जयपूर येथील नीरज शर्मा ( Neeraj Sharma Jaipur ) या विद्यार्थ्याने सांगितले की, "फेसबुक इंस्टाग्राममध्ये एक बग होता, ज्याद्वारे कोणत्याही अकाऊंटवरून रीलची थंबनेल बदलली जाऊ शकते. खातेधारकाचा पासवर्ड कितीही मजबूत असला तरी खात्याचा मीडिया आयडीची फक्त गरज होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मी माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये चूक शोधायला सुरुवात केली. खूप मेहनतीनंतर 31 जानेवारीला सकाळी मला इन्स्टाग्रामवर त्रुटी ( Instagram Bug ) कळली. हे, मी इंस्टाग्रामच्या या चुकीबद्दल फेसबुकला सांगितले. त्यानंतर तीन दिवसांनी मला त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी मला त्या चुकीचा डेमो शेअर करण्यास सांगितले."

या सर्व प्रकारानंतर नीरज शर्माने त्यांना 5 मिनिटांत दाखवण्यासाठी थंबनेल बदलले. त्यांनी त्याचा अहवाल मंजूर केला आणि 11 मे च्या रात्री, त्याला Facebook वरून एक मेल आला की त्याला $45,000 (सुमारे 35 लाख रुपये) बक्षीस देण्यात आले आहे. त्याच वेळी, रिवॉर्ड देण्यास चार महिन्यांचा विलंब झाल्याच्या बदल्यात, फेसबुकने बोनस म्हणून $ 4500 (सुमारे 3 लाख रुपये) देखील दिले.

हेही वाचा -Samsung Smartphone Feature : 'हा' फोन सिग्नल शिवाय देखील करू शकतो, इमरजेंसी कॉल

Last Updated : Sep 19, 2022, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details