नवी दिल्ली: खाद्यपदार्थांपासून ते सर्वच वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे (rising food and fuel prices) एप्रिलमध्ये घाऊक किंमत-आधारित महागाईचा दर 15.08 टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर (Inflation hit a record high of 15.08% पोहोचला आहे. मार्चमध्ये तो 14.55 टक्के आणि गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 10.74 टक्के होता. एप्रिल 2022 मधील महागाईचा उच्च दर प्रामुख्याने खनिज तेल, मूलभूत धातू, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थ, गैर-खाद्य वस्तू, अन्न उत्पादने आणि रसायने आणि रासायनिक उत्पादने इत्यादींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झाला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात हे स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी एप्रिलपासून सलग 13 व्या महिन्यात घाऊक किंमत-आधारित महागाई दर दुहेरी अंकात राहिला आहे. भाजीपाला, गहू, फळे आणि बटाट्याच्या किमतीत वर्षभरापूर्वीच्या काळात मोठी वाढ झाल्याने खाद्यपदार्थांची महागाई ८.३५ टक्के होती. इंधन आणि उर्जा क्षेत्रात महागाई 38.66 टक्के होती, तर उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे 10.85 टक्के आणि 16.10 टक्के होती.