इंदूर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका 9 वर्षीय जैन मुलाचे धर्मांतर झाल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदार वडील महेश कुमार जैन यांनी तक्रार केली आहे की, आरोपी इलियास कुरेशी हा माझी पत्नी रिया (नाव बदलले आहे) हिच्यासोबत 5 वर्षांपासून राहत होता. त्या दोघांसोबत माझा 9 वर्षांचा मुलगाही राहतो. आरोपीने त्याची सुंता करून धर्म परिवर्तन केले आहे'. तक्रारदार वडील पुढे म्हणाले की, 'आरोपीने मुलाचे नाव बदलून मन्नान ठेवले आहे. आता तो सर्वत्र या नावानेच राहतो'. फिर्यादी महेशकुमार जैन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी धर्मांतर व फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी इलियास कुरेशी याला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण? :तक्रारदारमहेश कुमार नाहटा (जैन) हे राजस्थानच्या सिवान बारमेर येथील रहिवासी आहेत. ते म्हणाले की, '2014 मध्ये माझे लग्न शाजापूर येथील रहिवासी असलेल्या रियासोबत झाले होते. जुलै 2015 मध्ये आम्हाला मुलगा झाला. 25 फेब्रुवारी 2018 रोजी रियाच्या माहेरी एक कार्यक्रम होता त्यानिमित्त मी पत्नी आणि मुलासह तिथे गेलो होतो. 4 दिवसांनी आम्ही घरी परतलो तर पत्नी आणि मूल दोघेही रतलाम स्टेशनवरून बेपत्ता झाले होते. मी लगेच रतलाम पोलिसात याबाबत तक्रार केली आणि माझ्या स्तरावर दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न सुरू केला'.
कोर्टात केस करून मुलाचा ताबा मागितला : महेश पुढे म्हणाले की, 'काही दिवसांनंतर मला कळले की, माझी पत्नी आणि मुलगा इलियास कुरेशी या व्यक्तीसोबत राहतात. त्यानंतर मी त्याच्याकडे गेलो आणि पत्नीला घरी परतण्यासाठी खूप समजवले. पण ती मान्य झाली नाही. तिने आमचे मूलही त्याच्याकडून परत घेण्यास मान्य केले नाही आणि तमाशा करायला सुरुवात केली. नंतर मी शाजापूर कोर्टात केस केली आणि कोर्टात मुलाचा ताबा मागितला. पण इलियास आणि रिया मुलासह गायब झाले. यानंतर मी सतत माझ्या मुलाचा आणि त्या दोघांचा शोध घेत होतो'.