नवी दिल्ली : यूएईमधील शारजाह येथून हैदराबादला ( Sharjah To Hyderabad ) येणारे विमान रविवारी अचानक पाकिस्तानातील कराची येथे उतरले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते कराचीच्या दिशेने वळवण्यात ( Indigo Emergency landing ) आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी प्रवाशांना हैदराबादला नेण्यासाठी कराचीहून अतिरिक्त विमान पाठवण्यात येत असल्याची माहिती इंडीओ एअरलाइन्सने दिली आहे.
Indigo Emergency landing In Karachi : इंडिगोचे विमान कराचीत उतरविले, इंजिनमध्ये झाला बिघाड
युएईमधील शारजाह येथून हैदराबादला ( Sharjah To Hyderabad ) येत असलेले विमान रविवारी अचानक पाकिस्तानातील कराची विमानतळावर उतरविण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने विमान कराची विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. ( Indigo Emergency landing )
Indigos
कराचीला दुसरे विमान पाठविणार -मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकाला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडिगोचे शारजाह-हैदराबाद विमान पाकिस्तानमधील कराचीला वळवण्यात आले, त्याची विमानतळावर चौकशी करण्यात येत आहे. विमान कंपनी कराचीला दुसरे विमान पाठवण्याचा विचार करत आहे. गेल्या दोन आठवड्यांत कराचीत उतरणारी ही दुसरी भारतीय विमान कंपनी आहे.