देवनहल्ली (कर्नाटक) :इंडिगो फ्लाइट मध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा संदेश मिळाल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. (threat on tissue paper in indigo flight). बेंगळुरू केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरत असताना ही घटना घडली. विमान कोलकाताहून आले होते. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने विमानाची कसून तपासणी केली असता ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात विमानतळ कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Indigo Flight Bomb Threat).
Indigo Flight Bomb Threat : इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची पोकळ धमकी, प्रकरणाचा तपास सुरू - केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात
बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने विमानाची कसून तपासणी केली असता ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात विमानतळ कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Indigo Flight Bomb Threat).
Indigo Flight Bomb Threat
टिश्यू पेपर वर लिहिली धमकी : 6E 379 इंडिगो विमानाने काल पहाटे 5:29 वाजता कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरून उड्डाण केले आणि सकाळी 8:10 वाजता देवनहल्ली केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यावेळी एका सीटवर एक संशयास्पद टिश्यू पेपर असल्याचे इंडिगो क्रूच्या लक्षात आले. टिश्यू पेपर वर निळ्या शाईने फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा संदेश लिहिला होता. त्यानंतर तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाचारण करून तपासणी करण्यात आली.