वॉशिंग्टन :कोविड महामारीशी लढताना भारताने जगाला आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली आहे. कोरोना विषाणूच्या आजारादरम्यान भारत जगाला कोविड-19 लसींचा निर्यात करणारा देश होता. व्हाईट हाऊसनेही जागतिक स्तरावर कोविड-19 विरुद्ध लसींच्या ( COVID 19 Vaccines ) पुरवठ्यात भारताची महत्त्वाची भूमिका मान्य केली आहे. 26 ऑक्टोबर रोजी व्हाईट हाऊसचे ( White House ) कोविड-19 प्रतिसाद समन्वयक आशिष झा ( Dr. Ashish Jha ) यांनी व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत भारताच्या लस निर्मिती क्षमतेची प्रशंसा केली आहे. भारत हा जगाला लसींचा प्रमुख निर्यातदार देश असल्याचे वर्णन करताना त्यांनी भारताची लस निर्मिती क्षमता 'अविश्वसनीय' असल्याचे म्हटले आहे.
भारत हा लसींचा प्रमुख निर्यातदार :मंगळवारी पत्रकारांना संबोधित करताना, व्हाईट हाऊसचे कोरोनाव्हायरस प्रतिसाद समन्वयक डॉ आशिष झा म्हणाले की भारत त्याच्या अविश्वसनीय उत्पादन क्षमतेमुळे लसींचा प्रमुख निर्यातदार आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. आशिष झा म्हणाले की, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांच्यात क्वाड भागीदारीतील धोरणात्मक सुरक्षा संवादामध्ये कोरोनाव्हायरस हा बिडेन प्रशासनासाठी एक प्रमुख विषय होता. डॉ. आशिष म्हणाले की, भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक देश आहे. स्वतःसाठी नाही. जगाला लस पुरवण्याच्या बायडेन प्रशासनाच्या निर्णयाचा बचाव करताना आशिष झा म्हणाले की अमेरिका सर्व कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना लस पुरवत राहील.