महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाच्या फटक्यातून देशाची अर्थव्यवस्था सावरली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली असताना आपण उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना (production-linked incentive) सुरू केली. त्यामधून भारताला नव्या संधी मिळवून देण्याचा उद्देश आहे. त्याचा सुरतसारख्या शहरांना फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

By

Published : Sep 11, 2021, 4:56 PM IST

अहमदाबाद - कोरोना महामारीच्या फटक्यातून सावरत देशाची अर्थव्यवस्था ही बळकट झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र यांनी म्हटले. अहमदाबादमधील शारदाधाम भवनच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. जेव्हा जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा भारताने आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबविला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्था स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आपण सुधारणा करत होतो. जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली असताना आपण उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना (production-linked incentive) सुरू केली. त्यामधून भारताला नव्या संधी मिळवून देण्याचा उद्देश आहे.

हेही वाचा-गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' आहेत नावे

वस्त्रोद्योग क्षेत्र आणि सुरतसारख्या शहरांना मोठा फायदा होणार

उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना वस्त्रोद्योग क्षेत्राकरिताही लागू केल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. या योजनेचा वस्त्रोद्योग क्षेत्र आणि सुरतसारख्या शहरांना मोठा फायदा होणार आहे. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना ही 10 महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी आहे. कोरोना महामारीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा व्हावी, असा या योजनेचा उद्देश आहे. आपण स्वत:ला 21 व्या शतकामधील जागतिक अर्थव्यवस्थेचे नेते म्हणून पाहिले पाहिजे. भारताकडे संधीची कमतरता नाही, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

हेही वाचा-Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पहिल्या तिमाहीत जीडीपीत 20.1 टक्क्यांची वाढ

देशाच्या सकल उत्पादनात (जीडीपी) चालू वर्षाच्या एप्रिल ते जूनच्या तिमाहीत 20.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील तिमाहीत जीडीपीत 24.4 टक्क्यांची घसरण झाली होती. जीडीपीची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. मागील तिमाहीत अंदाजीत जीडीपी 32.38 लाख कोटी रुपये होता. तर प्रत्यक्षात जीडीपी हा 26.95 लाख कोटी रुपये होता. सध्याच्या किमतीप्रमाणे एप्रिल ते जून तिमाहीमध्ये जीडीपीत 31.7 टक्के (38.89 लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. त्यामागील तिमाहीत जीडीपीत 22.3 टक्के (51.23 लाख कोटी रुपये) वाढ झाली होती. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या बंधनामुळे अंदाजित जीडीपीवर परिणाम झाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.

दरम्यान, अहमदाबादमधील शारदाधाम भवनमधील कॉम्पलेक्समध्ये तरुण-तरुणींना रोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details