मुंबईभारत स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षेसाजरी करत आहे Indian Independence Day . त्या पार्श्वभूमीवर जे भारतीय व्यंगचित्रकार तुम्हाला माहित नसतील त्यांची आज माहिती देणार आहोत Indian Cartoonist . सामाजिक समस्यांपासून ते राजकीय गोंधळापर्यंत व्यंगचित्रकार नागरिकांना जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतात. व्यंगचित्रकार त्यांच्या विस्मयकारक विनोदबुद्धी आणि स्केचिंग कौशल्यांसह घडामोडींना ठळक करून फरक निर्माण करतात Best of Bharat .
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील शिवसेनेचे संस्थापकही प्रतिभावान व्यंगचित्रकार होते. फ्री प्रेस जर्नलमधून व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांनी Bal Thackeray आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी मार्मिकमध्ये नियमितपणे व्यंगचित्रं काढणं सुरू ठेवले. राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार होते. घटना प्रसंगांतील विसंगती विरोधाभास टिपण्यातली त्यांची विचारक्षमता आणि रेषांवरील कमालीची हुकूमत व्यंगचित्राचा विषय ठरलेल्या व्यक्तींचा गाढा अभ्यास आणि आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीने त्यांची व्यंगचित्रे त्याकाळी खूप गाजली.
राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे Raj Thackeray हे त्यांच्या वक्तृत्वामुळे आणि त्यांच्या व्यंग चित्रांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांवर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आहे. कॉलेजमध्ये असताना एकदा मला बाळासाहेबांनी एक चौकोन फक्त काळ्या रंगाने रंगवायला सांगितला. १० मिनिटांत ते काम झालं. मार्मिक मासिकात एका विषयावर निषेध व्यक्त करायचा होता, त्यासाठी तो चौकोन होता. ते राज ठाकरे यांच पहिलं व्यंगचित्र होतं. १९८८ मध्ये शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले. राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांचे व्यंगचित्र काढलं. राजकीय नेते, महत्वाच्या घडामोडींवर त्यांची व्यंगचित्र याची दखल मिडियाकडून घेतली जाते.
मारियो डी मिरांडा मारियो डी मिरांडा mario de miranda यांनी 1953 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपसाठी व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. जरी त्यांनी औपचारिकपणे कलेचा अभ्यास केला नसला तरी कागदावरील त्यांच्या संवादात्मक कल्पनांमुळे त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले.
सुधीर तैलंगसुधीर तैलंग Sudhir Tailang यांना लहानपणापासून व्यंगचित्रे काढण्याची आवड होती. सुधीर तैलंग लहानपणी तैलंगला टिनटिन फँटम आणि ब्लॉंडी यांसारखे कॉमिक्स पाहायचे. याची त्यांना भुरळ पडली होती. ज्याने त्याला व्यंगचित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. त्यांचे पहिले व्यंगचित्र 1970 मध्ये वयाच्या 10 व्या वर्षी वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते.2009 मध्ये त्यांनी नो प्राइम मिनिस्टर नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले ज्यात मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील व्यंगचित्रे आणि चित्रे होती. कार्टूनिंग कलेतील योगदानाबद्दल त्यांना 2004 मध्ये प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार मिळाला.