नवी दिल्ली -नुकतेचं स्वामी रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीसंदर्भात अवमानजक भाष्य केले. हा संपूर्ण विषय वादग्रस्त ठरला आणि देशभरातील डॉक्टरांनी बाबांविरोधात मोर्चा उघडला. देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनाही कठोर शब्दांत बाबा रामदेव यांना पत्र लिहावे लागले. त्यानंतर रामदेब बाबा यांनी आपले वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. आता हे प्रकरण शांत होते न होतेच तर रामदेव बाबांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये डॉक्टारांची टर उडवल्याचे पाहायला मिळतयं.
योगगुरू स्वामी रामदेव आपल्या भक्तांना दररोज सकाळी 4:30 ते 7 या वेळेत पतंजली योगपीठ व इतरत्र योग शिकवतात. यावेळी ते आपल्या भक्तांना देशभक्ती, राजकारण आणि आयुर्वेदाबद्दल बोलत राहतात. त्यांचा असात योग शिकवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत रामदेव बाबा म्हणतात, की टर टर करत असतात. टर बनायचे आहे टर, डॉक्टर. लसीचा डबल डोस घेतल्यानंतरही 1000 पेक्षा जास्त डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. जो स्वत:ला नाही वाचवु शकला, तो कसला डॉक्टर. तर मी म्हणतो, डॉक्टर बनायचे आहे. तर स्वामी रामदेव बाबाप्रमाणे बना. ज्याच्याकडे कोणतीही पदवी नाही. विदआउट एनी डिग्री विथ डिग्निटी आय एम ए डॉक्टर. या व्हिडिओची नेमकी वेळ आणि तारीख अद्याप माहित नाही. परंतु रामदेव डॉक्टरांना टोमणे मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.