हरारे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या India vs Zimbabwe 3rd ODI मालिकेतील शेवटचा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने Captain KL Rahul नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 8 बाद 289 धावा केल्या आणि झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक 130 धावा केल्या. गिलच्या वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.
तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी -
नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. शिखर धवन आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. दरम्यान, राहुल 30 धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ धवननेही 40 धावा केल्या. येथून शुभमन गिल आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. किशन 50 धावा करून बाद झाला.