मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेची ( IND vs AUS T20 Series ) सुरुवात 20 सप्टेंबर रोजी होणार्या पहिल्या सामन्याने होणार आहे. टी-20 विश्वचषका 2022 ( T20 World Cup 2022 ) च्या पूर्वी दोन्ही संघ आपली तयारी मजबूत करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. नुकत्याच झालेल्या आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश करणे भारताला अपयश आले होते. ग्रुप स्टेजनंतर रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे संघाची रचना बिघडली. अशा परिस्थितीत रोहित शर्माला या मालिकेसह भारतीय प्लेइंग इलेव्हन मजबूत करायला आवडेल.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताने कांगारूंवर वर्चस्व गाजवले आहे. पण गेल्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवून भारताला चकित केले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 हेड टू हेड ( India vs Australia T20 head to head ) -
टी-20 क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामने जिंकून भारताने वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध 9 विजय मिळवले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात टीम इंडियाच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले, तर भारत येथेही पुढे आहे. टीम इंडियाने घरच्या मैदानावर 7 पैकी 4 सामन्यात कांगारूंचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर केवळ तीन सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाने साधली आहे विजयाची हॅट्ट्रिक ( Australia hat-trick of victory ) -
याच भूमीवर गेल्या तीन सामन्यांत भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. ऑस्ट्रेलियाने 2017 मध्ये भारताच्या दौऱ्यावर असताना दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला होता. यानंतर त्याने 2019 मध्ये खेळलेली 2 सामन्यांची टी-20 मालिका 2-0 ने जिंकली होती. पहिल्या सामन्यात कांगारूंनी भारताला 3 विकेट्सने पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सनी धुळ चारली होतची. रोहित शर्मा आणि कंपनीची नजर हा पराभवाचा सिलसिला तोडण्यावर असेल.