नवी दिल्ली : आज संपूर्ण देश पंतप्रधान मोदींचा 71वा वाढदिवस साजरा करत आहे (PM Narendra Modi 71th Birthday). या निमित्ताने देशात विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत देशात कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले. तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत २ कोटींचा टप्पा पार करण्यात आला.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात 21 जून रोजी 88.09 लाख आणि 27 ऑगस्ट रोजी 1.03 कोटी विक्रमी लसीकरणाचा पल्ला गाठण्यात आला होता. आता पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी 20 दिवसांचा मेगा इव्हेंटही आयोजित करत आहे. या कार्यक्रमाला सेवा आणि समर्पण अभियान असे नाव देण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेली ही मोहीम 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
दुपारी 1:30 पर्यंत 1 कोटीचा आकडा पार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा लसीकरण मोहीम सुरू आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत देशात 1 कोटीहून अधिक लस देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी एक लाखांहून अधिक ठिकाणी लस दिली जात आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरेही घेण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले आहे की, चला लस सेवा करूया, ज्यांनी लसीचा डोस घेतला नाही, ते घ्या आणि त्याला मोदींच्या वाढदिवसाची भेट द्या.
लसीकरण मोहिमेत राज्यांची स्थिती
लसीकरण मोहिमेत आघाडीची 5 राज्ये
1 उत्तर प्रदेश - 9,08, 08, 863
2 महाराष्ट्र - 7, 08, 15, 786
3 मध्य प्रदेश - 5,40, 73, 805
4 गुजरात - 5, 40, 46, 434
5 राजस्थान - 5, 18, 03, 108