नवी दिल्ली - देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही वाढत असल्याचे दिसत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यातच भारतात गेल्या 24 तासांत 50 हजार 848 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 1 हजार 358 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 68 हजार 817 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या सुमारे दीड लाखांच्या पुढे गेली आहे. तर देशातील रिकव्हरी रेट 96.56 वर पोहचला आहे. तर मृत्यू दर हा 1.30 आणि सक्रिय रुग्णांचा दर 2.14 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत 54,24,374 हजार जणांना लस टोचवण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 29,46,39,511 जणांचे लसीकरण झाले आहे.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
- एकूण रुग्ण : 3,00,28,709
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,89,94,855
- एकूण मृत्यू : 3,90,660
- सक्रिय रुग्ण संख्या : 6,43,194
- एकूण लसीकरण : 29,46,39,511