नवी दिल्ली -जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. गेल्या 24 तासात 30 हजार 757 नव्या रुग्णांची नोंद आहे. तर 541 मृत्यू झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून 67 हजार 538 रिकव्हर झाले आहेत. देशातील विविध रुग्णालयांमध्ये 3 लाख 32 हजार 918 जणांवर ( Corona infection in India ) उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 4 कोटी 19 लाख 10 हजार 984 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 510413 जणांचा कोरोनामुळे मूत्यू झाला. तर यासोबतच कोरोनावरील लसीकरण सुरू झाल्यापासून आजपर्यंत तब्बल 1,74,24,36,288 जणांचे लसीकरण झाले आहे.