महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक; कर्मचाऱ्यांमध्ये 74 टक्के महिलांचा सहभाग - भारतातील दुध उत्पादक

देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसायाचे योगदान मोठे आहे. दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक असून जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान २३ टक्के आहे. (World Dairy Summit 2022) दुग्धव्यवसाय देशात या क्षेत्रातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Sep 12, 2022, 8:22 PM IST

नवी दिल्ली - येथे जागतिक डेअरी समिट 2022 ला लॉन्च करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की जगभरात दुग्ध व्यवसाय 2 टक्के दराने वाढत आहे, तर भारतात हे क्षेत्र 6 टक्के दराने वाढत आहे. या क्षेत्रातील महिलांच्या भूमिकेविषयी माहिती देताना ते म्हणाले की, डेअरी क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ७४% महिला आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तीन राज्यांचे मुख्यमंत्री, 40 देशांचे प्रतिनिधी तसेच 156 तज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान देशातील या झपाट्याने वाढणाऱ्या उद्योगाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसायाची भूमिका काय आहे आणि आगामी काळात कोणती आव्हाने आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

देशातील दुधाचे उत्पादन सुमारे 6.2% - भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून त्यात अनेक क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्र देखील त्यापैकी एक आहे. या अर्थव्यवस्थेत दुग्धजन्य पदार्थांचे मोठे योगदान आहे. दुग्धव्यवसाय हा देशाच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत 5% योगदान देणारा सर्वात मोठा कृषी माल मानला जातो. सध्या आकडेवारीवर नजर टाकली तर दुग्ध उत्पादनात भारताचा संपूर्ण जगात पहिला क्रमांक लागतो आणि जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा २३ टक्के आहे. दुग्धव्यवसाय देशात या क्षेत्रातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट रोजगार देखील प्रदान करतो. 2020-21 मध्ये देशातील दुधाचे उत्पादन सुमारे 6.2% च्या चक्रवाढ वार्षिक वाढीने 209.96 दशलक्ष टन झाले आहे. 2014-15 मध्ये ते केवळ 146.31 दशलक्ष टन होते.

ई-बिल प्रणाली सुरू करण्याची योजना - पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रणासाठी वाटप वाढवण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत (2022-23)साठी पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रणाच्या वाटपामध्ये सुमारे 60% वाढ झाल्यामुळे निरोगी पशुधन सुनिश्चित होईल आणि देशाच्या दूध उत्पादनावर देखील परिणाम होईल. या क्षेत्रात डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे. या क्षेत्रातील डिजिटल बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि फिनटेक नवकल्पनांना प्रोत्साहन दिल्याने दूध खरेदीदरम्यान देयके सुव्यवस्थित करून अधिक पारदर्शकतेद्वारे पशुधन क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. मंत्रालयांद्वारे खरेदीसाठी पूर्णपणे पेपरलेस, ई-बिल प्रणाली सुरू करण्याची योजना देखील आहे असही यावेळी स्पष्ट केले आहे.

नवीन तांत्रिक कौशल्ये - देश उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश झाला असला तरी निर्यातीत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, कारण आपला देश त्यात खूप मागे आहे. डेअरी अॅनालॉग्स, वनस्पती-आधारित उत्पादने आणि भेसळ करणारे हे डेअरी उद्योगासाठी एक मोठे आव्हान आणि धोके आहेत. त्याचबरोबर हिरवा चारा संसाधनांचा अभाव आणि जनावरांच्या रोगांवर कुचकामी नियंत्रण याकडे आज लक्ष देण्याची गरज आहे. देशात देशी जातींसाठी क्षेत्राभिमुख संवर्धन धोरणाचा अभाव आहे आणि अधिक दुधाच्या पार्श्वभूमीवर देशी जाती वाचवणे हे सरकारसमोर मोठे आव्हान असेल. दुध व्यवसाय आणि उत्पादनाशी निगडित शेतकऱ्यांना नवीन तांत्रिक कौशल्ये आणि दर्जेदार बाजार व्यवस्था उपलब्ध करून देण्यावरही सरकारने भर देण्याची गरज आहे, जेणेकरून लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन अधिकाधिक लोक एकमेकांकडे बघून या क्षेत्रात जोडले जावेत याचा फायदा होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details