महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IND vs PAK Asia Cup: आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तानची आज पुन्हा लढत - भारत पाकिस्तान मॅच

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामने अटीतटीचे होत आहेत. हे सामने टी-२० फॉरमॅटमधील (IND vs PAK Asia Cup) असल्यामुळे चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. सध्या सुपर-४ फेरीतील सामने सुरू झाले असून यामध्ये आज रविवार (दि. 4 सप्टेंबर)रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे.

IND vs PAK Asia Cup
IND vs PAK Asia Cup

By

Published : Sep 4, 2022, 7:43 PM IST

Updated : Sep 4, 2022, 10:36 PM IST

नवी दिल्ली - यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामने अटीतटीचे होत आहेत. हे सामने टी-२० फॉरमॅटमधील असल्यामुळे चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. सध्या सुपर-४ फेरीतील सामने सुरू झाले असून यामध्ये आज रविवार (दि. 4 सप्टेंबर)रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. (IND vs PAK Asia Cup) पाकिस्तानचा मागील सामन्यात मोठा पराभव झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यावेळी पाकिस्तानची जोरदार तयारी आहे. तर भारतीय संघ आपली विजयी कामगिरी कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत असणार आहे. पाकिस्तानने टॉस जिंकला आहे.

आशिया चषक 2022 मध्ये, सुपर 4 मधील भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 7 विकेट गमावून 181 धावा केल्या आणि पाकिस्तानला 182 धावांचे लक्ष्य दिले. 9 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 67/2 आहे. पाकिस्तानला आणखी एक धक्का. युझवेंद्र चहलने फखर जमानला विराट कोहलीने झेलबाद केले. फखर जमानने 18 चेंडूत 15 धावा केल्या आहेत.

5 ओवर: रिजवान-झमान क्रीजवर5 ओवरनंतर पाकिस्तानने एका विकेटच्या मोबदल्यात 54 धावा केल्या आहेत. सध्या मोहम्मद रिझवान 17 आणि फखर जमान 5 धावा केले आहेत. चौथ्या षटकात 22 धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला.

पाकिस्तानला पहिला धक्का बसला. रवी बिश्नोईने बाबर आझमला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. बाबर आझमने 10 चेंडूत 14 धावा केल्या.

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 44 चेंडूत 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यादरम्यान कोहलीने चार चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचे हे सलग दुसरे आणि टी-20 क्रिकेटमधील 32 वे अर्धशतक आहे. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक 2 बळी घेतले.

भारताला सहावा धक्का नसीम शाहने दीपक हुड्डाला मोहम्मद नवाजकरवी झेलबाद केले. दीपक हुडाने 14 चेंडूत 16 धावा केल्या. विराट कोहलीने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग दुसरे आणि टी-20 क्रिकेटमधील 32 वे अर्धशतक आहे.

15 ओवर : भारताने 10 ते 15 ओवरमध्ये 2 विकेट गमावल्या15 ओवरनंतर भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 135 धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली 40 आणि दीपक हुडा 0 धावा करून क्रीजवर आहे. 10 षटक ते 15 ओवर दरम्यान भारताने दोन विकेट गमावल्या. भारताला चौथा धक्का १४व्या ओवर १२६ धावांवर बसला. भारताला 15व्या ओवर 131 धावांवर 5 धक्का बसला.

भारताला पाचवा धक्कामोहम्मद हसनैनने हार्दिक पांड्याला मोहम्मद नवाजकरवी झेलबाद केले. हार्दिक पांड्याने 1 चेंडूत 0 धावा केल्या.

भारताला चौथा धक्का शादाब खानने ऋषभ पंतला आसिफ अलीकडे झेलबाद केले. ऋषभ पंतने 12 चेंडूत 14 धावा केल्या.

10 ओवर : भारताने 6 ते 10 षटकांमध्ये 3 विकेट गमावल्या10 ओवरनंतर भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात 93 धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली 18 आणि ऋषभ पंत 1 धावा करून क्रीजवर आहे. 6 षटकांपासून ते 10 षटकांदरम्यान भारताने 3 विकेट गमावल्या. सहाव्या षटकात भारताला 54 धावांवर पहिला धक्का बसला. भारताला दुसरा धक्का सातव्या षटकात ६२ धावांवर बसला. भारताला 10व्या षटकात 91 धावांवर तिसरा धक्का बसला.

भारताला तिसरा धक्का मोहम्मद नवाजने सूर्यकुमार यादवला आसिफ अलीकडे झेलबाद केले. सूर्यकुमार यादवने 10 चेंडूत 13 धावा केल्या.

भारताला दुसरा धक्का बसला शादाब खानने केएल राहुलला मोहम्मद नवाजकडे झेलबाद केले. राहुलने 20 चेंडूत 28 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार आला.

भारताला पहिला धक्काहारिस रौफने रोहित शर्माला खुशदिल शाहकरवी झेलबाद केले. रोहितने 16 चेंडूत 28 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार आले. रोहितचा स्ट्राईक रेट 175 होता.

पाच ओवर : रोहित-राहुल क्रीजवरपाच ओवरनंतर भारताने बिनबाद 54 धावा केल्या आहेत. सध्या केएल राहुल २६ आणि रोहित शर्मा २८ धावांसह खेळत आहेत.

हे दोन्ही संघ 8 दिवसांत दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. शेवटच्या सामन्यात भारताने 5 गडी राखून विजय मिळवला. आता हा सामना जिंकून फायनलचा मार्ग सुकर करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित 2 सामने जिंकावे लागतील.

2 संघ पुढीलप्रमाणे भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन.

Last Updated : Sep 4, 2022, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details