नवी दिल्ली INDIA Meeting :'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी ही बैठक होईल.
'इंडिया' आघाडीच्या प्रचार समितीची पहिली बैठक : मंगळवारी (५ सप्टेंबर) 'इंडिया' आघाडीच्या प्रचार समितीची पहिली बैठक दिल्लीतील मिलाप बिल्डिंग येथे होणार आहे. सायंकाळी ५ वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मागच्या आठवड्यातच 'इंडिया' आघाडीनं त्यांच्या आधीच्या १९ सदस्यीय प्रचार समितीमध्ये आणखी दोन सदस्यांचा समावेश केला. द्रमुकचे तिरुची शिवा आणि पीडीपीचे मेहबूब बेग हे प्रचार समितीतील नवीन सदस्य आहेत.
हेही वाचा :Amit Shah On INDIA Alliance : इंडिया आघाडीकडून 'सनातन धर्माचा' अपमान -अमित शाह
लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा प्रस्ताव : इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत झाली. या बैठकीत आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला. तसेच या बैठकीत जागावाटप प्रक्रियेवर लवकरच चर्चा होऊन ते लवकरात लवकर निश्चित केलं जाईल, असं जाहीर करण्यात आलं. बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आमचे सर्व पक्ष भारत आघाडीचा भाग आहेत. संयुक्त विरोधी आघाडीची पहिली बैठक २३ जून रोजी पाटणा येथे तर दुसरी बैठक १७-१८ जुलै रोजी बेंगळुरू येथे झाली होती.
इंडिया आघाडीच्या प्रचार समितीतील सदस्य पुढीलप्रमाणे : गुरदीप सिंह सप्पल - काँग्रेस, संजय झा - जदयू, अनिल देसाई - शिवसेना, संजय यादव - राजद, पीसी चाको - राष्ट्रवादी कॉंग्रेस, चंपाई सोरेन - झामुमो, किरणमय नंदा - सपा, संजय सिंग - आप, अरुण कुमार - सीपीआय (एम), बिनॉय विश्वम - सीपीआय, न्यायमूर्ती (निवृत्त) हसनैन मसूदी - नॅशनल कॉन्फरन्स, शाहिद सिद्दीकी - आरएलडी, एनके प्रेमचंद्रन - आरएसपी, जी देवराजन - एआयएफबी, रवी राय - सीपीआय (एमएल), थिरुमावलन, व्हीसीके, केएम कादर मोईदीन - आययूएमएल.
हेही वाचा :Remove INDIA Word : राज्यघटनेतून 'इंडिया' शब्द हटवण्याची तयारी, सरकार विशेष अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता