नवी दिल्ली INDIA Meeting :बुधवारी (१३ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी 'इंडिया' आघाडी समन्वय समितीची बैठक पार पडली. बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली, मात्र यावर कोणताही मोठा निर्णय झाला नाही. या बैठकीत राज्यांतर्गत इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये सहमती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच ठरवण्यात आलं.
समन्वय समितीत काय घडलं :
- इंडिया आघाडीची पहिली रॅली भोपाळमध्ये होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात रॅलीचं आयोजन करण्यात येईल.
- जातीनिहाय जणगणनेच्या मुद्यावर इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये एकमत आहे.
- इंडिया आघाडीचे सर्व पक्ष हा मुद्दा जनतेसमोर ठळकपणे मांडतील.
- समन्वय समितीची बैठक होतच राहणार. पुढील बैठकीची माहिती लवकरच दिली जाईल.
- मध्य प्रदेशात मोठे घोटाळे झाले आहेत. त्यामुळे रॅलीची सुरुवात तेथूनच करायला हवी - पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती
- बैठकीत इंडिया अलायन्सचे सदस्य महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे जोरकसपणे मांडण्याबाबत बोलले.
- इंडिया आघाडीतील ज्या पक्षांनी जागा जिंकल्या आहेत, त्या जागा त्यांच्यासोबतच राहतील. परंतु सध्या एनडीएच्या ताब्यात असलेल्या जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. - ओमर अब्दुल्ला
- इंडिया आघाडी विरोधात बातम्या चालवणाऱ्या काही माध्यम समूहांच्या शोमध्ये आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत.
- आजच्या बैठकीला १२ पक्षांचे नेते उपस्थित होते.