नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या २ लाख, २२ हजार, ३१५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, एका दिवसातील मृत्यूंची संख्या आज पुन्हा चार हजारांच्या वर नोंदवली गेली आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या तीन लाखांवर गेली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ४,४५४ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ३ लाख, ३ हजार ७२० झाली आहे. तसेच, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी, ६७ लाख, ५२ हजार ४४७ झाली आहे. कालच्या दिवसात देशातील एकूण ३ लाख, २ हजार ५४४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यानंतर देशातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २ कोटी, ३७ लाख, २८ हजार ११ झाली आहे.