महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

India Coronavirus Update दिलासादायक कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, देशात 8 हजार 586 नवे कोरोनाबाधित

India Coronavirus Update देशात गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 586 नवीन रुग्ण आढळले आहे. तर देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 506 वर पोहोचली आहे.

India Coronavirus Update
India Coronavirus Update

By

Published : Aug 23, 2022, 11:59 AM IST

मुंबईदेशात कोरोना Corona प्रादुर्भावात घट झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असले तरी धोका मात्र अद्याप टळला नाही. गेल्या 24 तासात कोरोनाच्या Covid19 आकडेवारीबाबत सागायचं झालं तर, देशात 8 हजार 586 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 96 हजार 506 वर पोहोचली आहे. तसेच, देशात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 4 कोटी 43 लाख 57 हजार 546 वर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण मृतांचा आकडा 5 लाख 27 हजार 416 वर पोहोचला आहे. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे, देशात रिकव्हरी रेट वाढला आहे. देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. पण यापैकी अनेक रुग्णात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 37 लाख 33 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत सोमवारी ५९२ नवे कोरोना रुग्णमुंबईत आज २२ ऑगस्टला ६,२४४ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५९२ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ५८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३८ हजार ९४१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १३ हजार ४९९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५,७६९ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९६६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०७१ टक्के इतका आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढमुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२, ११ ऑगस्टला ६८३, १२ ऑगस्टला ८७१, १३ ऑगस्टला ८६७, १४ ऑगस्टला ८८२, १५ ऑगस्टला ५८४, १६ ऑगस्टला ३३२, १७ ऑगस्टला ९७५, १८ ऑगस्टला १२०१, १९ ऑगस्टला १०११, २० ऑगस्टला ८४०, २१ ऑगस्टला ८१८, २२ ऑगस्टला ५९२ रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचाPalghar Video Viral मृत्यूनंतरही मरणयातना कायम, पालघरच्या ग्रामस्थांचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुडघाभर पाण्यातून प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details