नवी दिल्ली: भारतात दररोज कोरोना रुग्णांमधे मोठी घट नोंदवली गेली आहे. कारण गेल्या 24 तासांत भारतात 1 लाख 61 हजार 386 नवीन कोरोना रुग्णांची तसेच 1,733 मृत्यूची नोंद झाली आहे, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4 कोटी 16 लाख 30 हजार 885 वर, तर मृतांची संख्या 4 लाख 97 हजार 975 वर पोहोचली आहे.
India Corona Update: 24 तासात 1 लाख 61 हजार 386 नवीन कोरोना रुग्ण, 1,733 मृत्यू
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 61 हजार 386 नवीन कोरोना रुग्णां सोबत 1,733 मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील दैनिक पाॅझिटिव्हीटी दर 9.26 टक्क्यांवर घसरला तर साप्ताहिक सकारात्मकता दरही 14.15 टक्क्यांवर घसरला आहे.
भारतात मंगळवारी 1 लाख 67 हजार 059 नवीन कोरोना रुग्ण आणि 1,192 मृत्यूची नोंद झाली. यासह, देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 16 लाख 21 हजार 603 इतका वाढला आहे, जो आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 3.90 टक्के आहे.
देशातील पाॅझिव्हिटी रेट 9.26 टक्क्यांवर घसरला तर साप्ताहिक पाॅझिटिव्हीटी दरही 14.15 टक्क्यांवर घसरला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत तब्बल 2 लाख 81 हजार 109 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 95 लाख 11हजार 307 वर पोहोचली आहे. देशातील बरे होण्याचा दर 94.91 टक्के आहे. गेल्या 24 तासात एकूण 17 लाख 42 हजार 793 चाचण्या घेण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकुण ७३.२४ कोटींहून पेक्षा अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशव्यापी सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 167.29 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.