महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

1 year complet of vaccination campaign : लसीकरण मोहिमेला एक वर्ष! 92 टक्के लोकांचा पहिला डोस पुर्ण - केंद्रिय आरोग्य मंत्रालय

केंद्र सरकारने सुरू केलेल्या कोविड-19 लसीकरण मोहिमेला रविवार (दि. 16 जानोवारी)रोजी एक वर्ष पूर्ण झाले. (vaccination campaign In India) यामध्ये आतापर्यंत देशात एकूण 156.76 कोटी लसींचे व्यवस्थापन करण्यात आले. तर, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 92 टक्के लोकांना किमान लसीचा एक डोस मिळालेला आहे. (India completes one year of vaccination campaign) दरम्यान, देशभरातील काही राज्यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन कोविड प्रोटोकॉलमध्ये बदल केले आहेत.

लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण!
लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण!

By

Published : Jan 17, 2022, 7:45 AM IST

Updated : Jan 17, 2022, 9:26 AM IST

मुंबई - केंद्र सरकारने सुरू केलेल्या (vaccination campaign In India) कोविड-19 लसीकरण मोहिमेला रविवार(दि.16 जानोवारी)रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. होत असताना, गृह मंत्रालयाने जाहीर केले की, आतापर्यंत देशाने एकूण 156.76 कोटी लसींचे व्यवस्थापन केले आहे, (Central Health Department ) तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 92 टक्के लोकांना (About 92 Percent Population is Vaccinated) किमान एक लसी मिळाली आहे.

गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी ही मोहीम राबविण्यात आली

पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना लस देत गेल्या (One year completed of vaccination campaign) वर्षी 16 जानेवारी रोजी ही मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाइन कामगारांचे लसीकरण 2 फेब्रुवारीपासून सुरू झाले. (Union Ministry of Health) 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि 45 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील विशिष्ट सह-रोगी परिस्थितींसह लसीकरण सुरू झाले. 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकासाठी लसीकरण करण्यास सुरूवात झाली. यावर्षी 3 जानेवारी रोजी, 15-18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली. तिसरा डोस 10 जानेवारीपासून आरोग्य आणि आघाडीचे कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिला जात आहे.

भारताने नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 100 कोटी डोस दिले

याबाबत आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की लसीकरणासाठी लक्षणीय लोकसंख्या असलेल्या विकसित इतर देशांच्या तुलनेत भारताचा लसीकरण कार्यक्रम जगातील सर्वात यशस्वी ठरला आहे. भारताने नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 100 कोटी डोस दिले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सध्या जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो आहे

सध्या जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो आहे. दरम्यान, याबाबतचा भारतातील धोका पाहून रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये 2,71,202 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण संख्या 3,71,22,164 झाली आहे. यामध्ये ओमिक्रॉन प्रकारातील 7,743 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये 1,702 ने वाढ झाली आहे. जी एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक आहे. सक्रिय प्रकरणे 15,50,377 पर्यंत वाढली आहेत.

लसीकरण कार्यक्रमाने कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात मोठी ताकद जोडली

"आज आपण लसीकरण मोहिमेचे एक वर्ष साजरे करत आहोत. लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी सलाम करतो. आमल्या लसीकरण कार्यक्रमाने कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात मोठी ताकद जोडली आहे. यामुळे जीव वाचला आणि त्यामुळे उपजीविकेचे रक्षण झाले, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -राज्यात आज 41 हजार 327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर 31 रुग्णांचा मृत्यू

Last Updated : Jan 17, 2022, 9:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details