नवी दिल्ली India Canada Row : खलिस्तानी हरदिप सिंग निज्जर याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा दरम्यान तणाव निर्माण झालाय. यामुळं दोन्ही देशांमध्ये कटुता निर्माण झालीय. या तणावा दरम्यान भारतानं कॅनडाला त्यांचे राजदूत माघारी घेण्याचे आदेश देत कॅनडाला अल्टिमेटमही दिला होता. भारताचा अल्टिमेटम मिळताच कॅनडानं शरणागती पत्करून त्यांचे 41 राजदूत माघारी बोलावले आहेत, अशी घोषणा कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्लानी जोली यांनी केलीय.
India Canada Row : भारतानं अल्टिमेटम देताच कॅनडाची शरणागती; घेतला 'हा' मोठा निर्णय - कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्लानी जोली
India Canada Row : खलिस्तानी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर भारतानं कॅनडाला त्यांचे राजदूत माघारी घेण्याचे आदेश दिले होते.
Published : Oct 20, 2023, 12:38 PM IST
देशांतर्गत हस्तक्षेपात वाढ : भारतात कॅनडाचे एकूण 62 राजदूत आहेत. त्यापैकी 41 राजदूतांना परत बोलावण्यात आलंय. तर उरलेले 21 राजदूत मात्र भारतातच राहणार आहेत. भारतात मोठ्या प्रमाणावर कॅनडाचे राजदूत आहेत. देशातील अंतर्गत प्रकरणात हे राजदूत हस्तक्षेप करत होते. त्यामुळं त्यांनी तातडीनं देश सोडायला हवं, असं भारतानं म्हटलं होतं. तसंच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या एका विधानानं भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला होता. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा दावा 18 सप्टेंबर रोजी ट्रुडो यांनी केला होता. ट्रुडो यांच्या या आरोपानं खळबळ उडाली होती. भारतानं हे आरोप फेटाळून लावले होते. यावर ट्रुडो यांचं विधान निराधार असून राजकीय हेतूनं त्यांनी हे विधान केल्याचं भारतानं म्हटलं होतं. यावर कॅनडानं भारताच्या राजदूताला बेदखल केलं होतं. त्याला जशास तसं उत्तर देत भारतानंही कॅनडाच्या राजदूतांना भारत सोडून जाण्याचं फर्मान बजावलं होतं.
- ट्रुडोंची नरमाईंची भूमिका : ट्रुडोंच्या विधानानं दोन्ही देशातील संबंधात कटुता आली होती. त्यानंतर भारतानंही आक्रमक भूमिका घेतल्यावर कॅनडाचे पंतप्रधान हळूहळू नरमले होते. त्यानंतर भारताला सहकार्य करण्याची ट्रुडोंनी भूमिका घेतली होती. यावर भारतानंही निज्जर हत्याकांडाचे ठोस सबूत दिल्यावर त्यावर विचार करू, असं म्हटलं होतं.
- नेमकं प्रकरण काय? : खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर याची 18 ऑक्टोबर रोजी कॅनडात गुरुद्वाराबाहेरच त्याची गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी कॅनडानं या हत्येसाठी भारताला दोषी ठरवत भारताच्या राजदूतांना कॅनडातून जायला सांगितलं होतं. त्यामुळं भारतानंही जशास तसं उत्तर देत कॅनडाच्या राजदूतांना भारतातून जाण्याचं फर्मान बजावलं होतं.
हेही वाचा :
- India Canada Row : हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण; मी 'फाईव्ह आईज'चा भाग नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुनावलं
- India Canada Relations : भारत-कॅनडा वाद; 'या' देशानं दिला भारताला पाठिंबा, कॅनडाला फटकारलं
- India Canada Row : कॅनडात हिंदू समुदायाला विरोधी पक्षनेत्यांचा पाठिंबा, द्वेषपूर्ण टीकेचा केला निषेध