नवी दिल्ली : भारतातील 5G स्मार्टफोनचे मार्केट वर्षे 2023 च्या अखेरीस 70 टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतीय स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये वर्षे 2020 च्या सुरुवातीापासूनच 5G शिपमेंटमध्ये 13 पट वाढ नोंदवली आहे. वाढत्या डिजीटल युगामध्ये स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. त्यामुळे वेगाने सेवा देणाऱ्या इंटरनेटची मागणी देखील वाढलेली आहे. हीच बाब लक्षात घेता वर्षे 2023 च्या अखेरिस भारतीय बाजारपेठेत 5G स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.
100 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च : 'CY2020 मध्ये केवळ 4 टक्क्यांपासून ते CY2023 मध्ये 45 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेतील वाटा, 5G स्मार्टफोन्सने निश्चितच करीत, खूप मोठा पल्ला गाठला आहे,' असे विश्लेषक-इंडस्ट्री इंटेलिजेंस ग्रुप (IIG), सायबरमीडिया रिसर्च (CMR) च्या मेनका कुमारी यांनी सांगितले आहे. CY2022 मध्ये, जवळपास 100 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले गेले.
5G स्मार्टफोन शिपमेंटमध्ये भारतीय बाजारपेठेचे नेतृत्व :मेनका कुमारी यांनी सांगितले की, '२०२३ मध्ये, भारतीय बाजारपेठेत सादर होणार्या नवीन स्मार्टफोन्सपैकी जवळपास ७५ टक्के 5G-सक्षम असतील, असा आमचा अंदाज आहे. मेनका कुमारी पुढे म्हणाल्या की, Samsung, OnePlus आणि Vivo ने CY2022 मध्ये 5G स्मार्टफोन शिपमेंटमध्ये भारतीय बाजारपेठेचे नेतृत्व केले. 5G व्हॅल्यू फॉर मनी (रु. 10,000-रु. 25,000) किमतीच्या विभागामध्ये, Xiaomi आणि realme यांचे प्रमुख योगदान होते.
स्मार्टफोनचे मूल्य कमी झाल्यास फायदा : 'पुढे जाऊन, ग्राहकांची सशक्त मागणी आणि भारतीय दूरसंचार कंपन्यांद्वारे प्रधान्याने दिली जाणारी 5G नेटवर्क सेवा, यामुळे नवीन वर्षात 5G स्मार्टफोन शिपमेंटसाठी आणखी गती मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे,' असे विश्लेषक-इंडस्ट्री इंटेलिजेंस ग्रुप (IIG), CMR च्या शिप्रा सिन्हा यांनी सांगितले. भारतात मोठ्या प्रमाणावर 5G सेवा स्वीकारण्याची गुरुकिल्ली ही इतरांबरोबरच परवडणाऱ्या स्मार्टफोन ग्राहक विभागात (रु. 10,000 पेक्षा कमी) 5G स्मार्टफोन सादर करण्यावर अवलंबून असेल. सिन्हा पुढे म्हणाल्या की, 'यासोबतच, ग्राहकांच्या अनुभवासाठी चांगली 5G उपलब्धता आणि प्रवेश योग्यता महत्त्वाची असेल.'
हेही वाचा : Lenovo Tab P11 5G : लेनोवो ने लॉन्च केला 5जी अँड्रॉइड टॅबलेट, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स