नवी दिल्ली:२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आजचा स्वातंत्र्यदिन मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा स्वातंत्र्यदिन असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करत आहेत. ईशान्येकडील राज्यांच्या सरपंचांसह सुमारे 1,800 पाहुण्यांना विशेष पाहुणे म्हणून आज आमंत्रित करण्यात आले आहे.
Live updates
- घराणेशाहीचा पक्ष ही विकृती आहे. बापुंच्या स्वप्नातील भारत साकारायचा आहे. विकसित भारताच्या विकासासाठी पुन्हा आशिर्वाद मागत आहे.
- भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगुललाचन या विरोधात लढा उभारणार आहे. घराणेशाही देशाच्या विकासाला लागलेली कीड आहे.
- खरा मित्र अशी भारताची जगात ओळख आहे. विश्वमंगल हाच भारताचा विचार आहे. विश्वास हेच भारताचे मोठे सामर्थ्य आहे. २०४७ मध्ये भारत हा विकसित देश असावा. लाल किल्ल्यावरून जनतेचे पुन्हा आशिर्वाद मागत आहे.
- गावागावातील २ कोटी महिलांना लखपती बनविण्याची योजना आहे. बचतगटामार्फत महिलांचा कुटुंबांना मोठा आधार होतो. महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- हा देश थांबणारा नाही, झुकणारा नाही व दमणारा नाही. नव्या संसदेचे आश्वासन दिले. हे काम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण झाले आहे. वेळेआधी काम पूर्ण करणे हे मोदी सरकारचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट व्हायचे. सिरीयल बॉम्बच्या घटना हा इतिहास झाला आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या घटना कमी झाल्या आहेत. देशाच्या सीमा सुरक्षित आहेत.
- ज्या कामांचे भूमीपजून करतो, त्याच कामांचे लोकापर्ण करतो, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
- आयातीबरोबर देशात महागाईही आयात होती. संपूर्ण जगाला महागाईचा विळखा आहे. भारताने महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महागाई कमी करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. शहरात चाळ, झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी कमी व्याजदरात बँकाकडून कर्ज देण्यात येणार आहे. देश पहिल्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेत येणार याची गॅरंटी आहे. जगात सर्वाधिक स्वस्त इंटरनेट भारतात उपलब्ध आहे.
- सहकारातून समृद्धीचा सरकारने अवलंब केला आहे. शेतकऱ्यांना स्वस्तात युरिया देण्यासाठी १० लाख कोटी देण्यात दिले आहेत. ३ लाख कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी, ७० हजार कोटी वन पेन्शन वन रँकसाठी सैनिकांना दिले आहेत. ८ कोटी तरुणांना रोजगार देण्यात आला आहे. ४ लाख कोटी गरिबांच्या घरासांठी देण्यात आले. साडेतेरा कोटी लोक गरिबीतून मध्यम वर्गात आले आहेत.
- २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. सध्या, भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. लाखो कोटींचे घोटाळे, भ्रष्टाचार होत असताना हे थांबविले आहे. देश आर्थिक स्वरुपात समृद्ध होताना केवळ तिजोरी भरत नाही. तर देश सामर्थ्यवान होतो. तिरंग्याला साक्ष ठेवून ही कामगिरी सांगत आहे.
- कोरोनानंतर बदलणाऱ्या जगात भारताने योगदान दिले आहे. कोरोना काळात भारताचे जगात कौतुक झाले आहे. राष्ट्र प्रथम हाच सरकारचा मूलमंत्र आहे. देशाच्या विकासासाठी स्थिर, मजबूत व बहुमत असलेल्या सरकारची गरज आहे.
- भारताच्या तंत्रज्ञान शक्तीबाबत जगाला उत्सुकता आहे. छोट्या शहरातील तरुण हे तंत्रज्ञान आणि खेळामध्ये आघाडीवर आहेत. देशामध्ये संधीची कमतरता नाही. आकाशाहून अधिक संधी उपलब्ध करण्याचे देशामध्ये सामर्थ्य आहे.
- लोकसंख्या, लोकशाही व वैविध्यता ही भारताची बलस्थाने आहेत. भारतामधील युवाशक्तीवर माझा विश्वास आहे. स्टार्टअप उद्योगांमध्ये भारत जगात सर्वोत्तम आहे.
- भारताच्या सामर्थ्याची जगाला जाणीव झाली आहे. जगात ३० वर्षांहून कमी वयोमान असलेली लोकसंख्या भारतात आहे. भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे. देशासमोर पुन्हा एकदा संधी आहे.
- या कालखंडात अमृतकाळात केलेले काम १ हजार वर्षांसाठी कायम राहणार आहे. इतिहास या घटनांची नोंद घेणार आहे.
- नैसर्गिक आपत्तीने देशाच्या अनेक भागांमध्ये मोठी संकटे निर्माण केली आहेत. या संकटाचा सामना करावा लागणाऱ्या सर्व कुटुंबांप्रती मी सहानुभूती व्यक्त करतो.
- मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेक महिला-मुलींशी गैरवर्तन करण्यात आले आहे. काही दिवसांपासून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे. शांततेमधूनच मार्ग निघणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे.
- जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजे भारत आहे. देशातील १४० कोटी लोक म्हणजे माझे कुटुंब आहे. ज्यांनी स्वातंत्र्यदिनासाठी योगदान दिले त्यांना वंदन आहे. देशाला स्वातंत्र्यदिनी माझ्या शुभेच्छा आहेत.
- पंतप्रधान मोदी राजघाटावर पोहोचले आहेत. त्यांनी बापूजींच्या समाधीला वंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ध्वजारोहण केले आहे.
- 2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रमुख सरकारी उपक्रमांबद्दल अधिक प्रसिद्धी करण्यासाठी योजनांबद्दल माहिती देणारे सेल्फी पॉइंट सुरू केले आहेत. देशातील नागरिक दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर पंतप्रधान मोदींचे भाषण आज पाहू शकतात.