रामोजी फिल्म सिटीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा हैदराबाद : 'रामोजी फिल्म सिटी' (RFC) येथे ७७ व्या 'स्वातंत्र्य दिना'चा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. 'रामोजी फिल्म सिटी'च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विजयेश्वरी चेरुकुरी यांनी यावेळी राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर लगेचच राष्ट्रगीत झाले. यावेळी फिल्म सिटीमधील अनेक अधिकारी व कर्मचारी हजर होते.
सर्व विभागांचे प्रमुख आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती : 'यूकेएमएल'चे संचालक शिवरामकृष्ण आणि 'रामोजी ग्रुप ऑफ कंपनी'चे एचआर अध्यक्ष अटलुरी गोपाळराव या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यासह रामोजी ग्रुपचे विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सोहळ्यासाठी संपूर्ण 'फिल्म सिटी' सजवण्यात आली होती :आज संपूर्ण फिल्म सिटीमध्ये देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. यावेळी एमडी विजयेश्वरी चेरुकुरी यांनी रामोजी फिल्म सिटीच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सोमवारीच या दिमाखदार कार्यक्रमासाठी मंच तयार करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी संपूर्ण फिल्म सिटी सजवण्यात आली होती.
जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी : उल्लेखनीय बाब म्हणजे, 'रामोजी फिल्म सिटी'ला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी असण्याचा मान मिळाला आहे. रामोजी फिल्म सिटी तिच्या अनोख्या अनुभवासाठी अनेक पर्यटकांना आकर्षित करते. यासोबतच फिल्म सिटीमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रनिर्मितीची भावना देखील आहे, जी फिल्म सिटीच्या बहुतेक महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगा फडकत असताना वर्षभर दिसून येते.
'रामोजी फिल्म सिटी' पर्यटकांचे आकर्षण : हैदराबादमधील 'रामोजी फिल्म सिटी' हॉलिडे डेस्टिनेशन असून, मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे. येथील दैनंदिन लाइव्ह शो, लाइव्ह स्टंट्स, राइड्स, गेम्स आणि थीम पार्क आकर्षणाचे केंद्र आहेत. इथे तुमच्या प्रत्येक बजेटला अनुरूप अशा ऑफर्स आहेत. येथे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात विंटर फेस्ट, न्यू इयर सेलिब्रेशन, हॉलिडे कार्निव्हल इत्यादींचा समावेश आहे. त्यासोबतच सुट्ट्या एंजॉय करण्यासाठी आणि भव्य विवाहसोहळ्यांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.
हेही वाचा :
- OTM Mumbai 2023 : आशियातील सर्वात मोठ्या ट्रॅव्हल ट्रेड शो प्रदर्शनात रामोजी फिल्मसिटीचा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू
- Ramoji Film City : रामोजी फिल्म सिटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, प्रतिष्ठित SIHRA पुरस्काराने सन्मानित
- Republic Day : रामोजी फिल्म सिटीत उत्साहात साजरा झाला प्रजासत्ताक दिन, रामोजी राव यांच्या हस्ते पार पडले ध्वजारोहण