नवी दिल्ली भारत आज आपला 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे 75th independence day मात्र सोशल मीडियावर काही जण स्वातंत्र्याच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या तर काही 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत Independence day तर काहीजण सोशल मीडियावर भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 2022 च्या शुभेच्छा देत आहे Indian Independence Day 2022 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना अनेकांचा संभ्रम होत आहे तो दूर करणे फार महत्वाचे आहे
200 वर्षाहून अधिकचा संघर्ष200 वर्षाहून प्रदीर्घ संघर्षानंतर भारताची ब्रिटिश राजवटीतून 15 ऑगस्टला मुक्तता झाली म्हणून आज आपण भारतीय या नात्याने स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करू शकलो आहोत कारण या पृथ्वीच्या असंख्य सुपुत्रांनी आणि वीरांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्याला गवसणी घातली त्यांनी मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण केले पंतप्रधान मोदींनी 9व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले यावेळी त्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले सर्व त्याग आणि बलिदानांना नतमस्तक होण्याची आज संधी आहे असे त्यांनी देशाला उद्देशून बोलताना सांगितले