IND vs PAKआशिया कप 2022 asia cup 2022 च्या महान सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून बदला पूर्ण केला आहे. 10 महिन्यांपूर्वी, T20 विश्वचषक 2021 च्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता, त्यानंतर टीम इंडिया Team India पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी आतुर झाली होती. IND vs PAK Asia Cup 2022 या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 147 धावांवर आटोपला, त्यानंतर टीम इंडियाला Team India विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 19.4 षटकांत 148 धावा करत सामना जिंकला आणि पाकिस्तानविरुद्धचा बदलाही पूर्ण केला. पांड्या 33 आणि जडेजा 35 यांनी अवघ्या 29 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात जडेजा बाद झाला, पण रोमहर्षक लढतीत पांड्याने षटकार खेचला आणि सामन्यातील भारताचा विजय India won the match निश्चित केला.
पाकिस्तानचा संघ 147 धावांवर आटोपलाभुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने रविवारी आशिया चषक टी 20 क्रिकेट स्पर्धेतील बहुचर्चित सामन्यात पाकिस्तानचा डाव 147 धावांत संपुष्टात आणला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. asia cup 2022 जो भुवनेश्वर आणि हार्दिकच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. भुवनेश्वरने 4 षटकांत 26 धावा देऊन 4 बळी घेतले. Dubai International Cricket Stadium त्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या विकेटचा समावेश होता. त्याचवेळी हार्दिकने 4 षटकांत 25 धावा देत 3 बळी घेत पाकिस्तानी मधल्या फळीचे कंबरडे मोडले. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 33 धावांत 2 बळी घेतले. भारत पाकिस्तान सामन्यात खेळण्याचा अर्शदीपचा हा पहिलाच अनुभव होता. वेगवान गोलंदाजांनी भारताच्या सर्व 10 विकेट घेतल्या.