नागपूर : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने आठ षटकांमध्ये ९१ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात विक्रम नोंदविला. त्यामुळे रोहित आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा क्रिकेटपटू ठरला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज नागपुरात खेळवला जात आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित आठ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा केल्या. भारतासमोर ९१ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 20 चेंडूत 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार अॅरॉन फिंचने 31 धावा केल्या. या दोन खेळाडूंशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. दुसरीकडे कॅमेरून ग्रीनला विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी धावबाद केले. स्टीव्ह स्मिथला हर्षल पटेलने धावबाद केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS ) संघात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील ( IND vs AUS T20 Series ) दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ( Vidarbha Cricket Association Stadium ) खेळला जाणार आहे. या सामन्याला सातला सुरुवात होणार होती. परंतु ओल्या आउटफिल्डमुळे टॉसला ( Toss delayed due to wet outfield ) उशीर झाला आहे. त्यामुळे रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) आणि अॅरॉन फिंच ( Captain Aaron Finch ) या दोन कर्णधारांमध्ये आठला नाणेफेक पार पडली.
भारतीय संघ या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी खुप महत्वाचा आहे. भारतासाठी हा सामना 'करो या मरो' अशा स्वरुपाचा असणार आहे. हा सामना जिंकून भारत मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवेल.