पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आरोग्यविषयक सल्ल्याला राजद नेते तेजस्वी यादव ( RJD leader Tejashwi Yadav ) यांनी गांभीर्याने घेतलेले ( Prime Ministers advice to Tejashwi Yadav ) दिसतेय. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे, यादवांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे सुरू केले असून वजन कमी करण्यासाठी शारीरिक कसरती ( Physical exercise of Tejashwi Yadav ) करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन आठवड्यात दोनदा स्वतःच्या शारीरिक कसरतींचा व्हिडिओ सोशल मीडियावर ( Tejashwi shared video of playing cricket ) टाकणारे ते पहिलेच विरोधी पक्षनेता ठरले आहे.
तेजस्वी यादव यांचा क्रिकेट व्हिडिओ -तेजस्वी यांनी त्यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले़, जीवन हे खेळाप्रमाणे आहे. प्रत्येकाने जिंकण्यासाठी जगले पाहिजे. मी कित्येक वर्षांनंतर क्रिकेट खेळतोय. ते म्हणतात जेव्हा ड्रायव्हर, स्वयंपाकी, सफाई कामगार, माळी आणि काळजी घेणारे तुमचे खेळाचे सोबती असतात आणि तुम्हाला हिट आणि बॉल आउट करण्यास उत्सुक असतात तेव्हा ते अधिक समाधान होते.
तेजस्वी उत्तम क्रिकेटर आणि खवय्ये -पंतप्रधान मोदी 12 जुलैला बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्यात भाग घेण्यासाठी पाटणात होते. यावेळी भेटीदरम्यान मोदी आणि तेजस्वी यादवांनी आरोग्यविषयक चर्चा केली. विशेष म्हणजे मोदींनी तेजस्वींना वजन कमी करण्याचा सल्ला दिला. आज तेजस्वींनी त्यांचे वडील आधी चालवित असलेली जुनी जीप ओढतानाचा आणि ढकलतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. तेजस्वी यादव पूर्वी क्रिकेटर होते मात्र शारीरिक दुखापतीनंतर त्यांनी क्रिकेटला रामराम ठोकला होता. लग्नानंतर त्यांचे वजन 10 किलोने वाढून 85 इतके झाले. ते खवैय्ये असून त्यांना मांसाहारात ग्रिल्ड चिकन, फिश फ्राय आणि मटन आवडते. यासह त्यांना चॉकलेट शेकही आवडतो. मोदींच्या सल्ल्यानंतर त्यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार नियंत्रित करत तळलेले पदार्थ आणि मिष्ठान्न वर्ज केले. तेजस्वी यादव अलीकडे पालेभाज्या आणि विना तेलाचे पदार्थ खात आहे. त्यांच्या जवळच्या सहयोगींनी नाव न छापण्याच्या अटीवर ईटीवी भारतला ही माहिती दिली.