नवी दिल्ली- प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्र आणि गोवामध्ये एका ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. प्राप्तिकर विभागाने या ग्रुपच्या 44 हून अधिक मालमत्तांवर छापे टाकले आहेत. हा ग्रुप आघाडीचा स्टील उत्पादक कंपनीचा आहे. या ग्रुपकडून पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवामध्ये व्यवसाय करण्यात येतो.
प्राप्तिकर विभागाने स्टील उत्पादनाशी संबंधित ग्रुपच्या मालमत्तांवर 25 ऑगस्टला छापे टाकले आहे. प्राप्तिकर विभागाने छाप्यादरम्यान अनेक कागदपत्रे आणि डिजीटल पुरावे जप्त केली आहेत. ग्रुप बेकायदेशीरपणे भंगार खरेदीसारख्या प्रकरणात गुंतल्याचे पुराव्यातून दिसून येत असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा-माझे वडील तालिबानसमोर कधीच झुकणार नाहीत- अमरुल्लाह सालेह यांच्या मुलीचे भावनिक ट्विट
बनावट बिलामधून 160 कोटींची खरेदी-