मुंबई - राज्यातील १०६ नागरपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली ( Local Body Election Maharashtra 2022 Result ) होती. एकूण ९७ नगरपंचायती पैकी भारतीय जनता पक्षाकडे १८, राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारा काँग्रेसकडे बारा आणि शिवसेनेकडे ८ नगरपंचायतीवर सत्ता काबीज केल्या आहेत. तर तिथेच ४६ स्थानिक आघाड्यांना नगरपंचायतवर विजयाचा झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत भाजपला ३८४, राष्ट्रवादीला ३४४, काँग्रेसला ३१६ तर शिवसेनेला २८४ जागा मिळाल्या आहेत. तसेच कम्युनिष्ट (एम) पक्षाला ११, बसपाला ४, मनसेला ४, इतर पक्षांना ८२ तर अपक्ष उमेदवारांना २०६ जागा मिळाल्या आहेत.
Nagar Panchayat Result : राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष.. मात्र, महाविकास आघाडीची सरशी
राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये एकूण ३८४ जागा जिंकत भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र महाविकास आघाडी राज्यात असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीनही पक्ष मिळून ९४४ जागा जिंकल्याने एकप्रकारे महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे चित्र आहे.
भाजपच्या ताब्यात २४ नगरपंचायती आल्या असल्या तरी महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर ३२ नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही एकप्रकारे भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शिर्डी नगरपंचायतीत १७ प्रभागांपैकी ११ प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे तेथे मतदान होऊ शकले नाही. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व ९ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी २० जानेवारी रोजी होणार असल्याने पक्षनिहाय जागांमध्ये उद्या बदल होणार आहे.
राज्यातील नगरपंचायतीचे निवडणुकीचे निकाल हाती आले असून नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकांमध्ये मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.
नगरपंचायतीच्या एकूण १८०२ जागांपैकी १६४९ जागांसाठी निवडणूक पार पडली. यावेळी हाती आलेल्या आलेल्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा ३८४ जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४४ उमेदवारांना यश मिळाले आहे. तर त्या पाठोपाठ नंबर तीनचा पक्ष काँग्रेस ठरला असून काँग्रेसने ३१६ जागांवर यश संपादन केला आहे. तर चौथ्या क्रमांकावर शिवसेना पक्ष असून शिवसेनेने २८४ जागांवर यश मिळवले. तर इतर उमेदवार तसेच स्थानिक आघाड्यांना ३१४ जागांवर यश मिळाले असल्याचे निवडणुकांमध्ये दिसत आहे.